शिक्षण मंत्रालय
“डिजिटल परिवर्तन आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण” या विषयावरील आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा सहभाग
भारतीय आणि जागतिक संस्थांमधील समन्वायाद्वारे ज्ञानाचे नवीन जाळे निर्माण धर्मेंद्र प्रधान यांनी केले आवाहन
Posted On:
27 SEP 2022 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आज नवी दिल्ली येथे, डेकिन विद्यापीठाने टिसीएसच्या सहयोगाने आयोजित केलेल्या “डिजिटल परिवर्तन आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण” या विषयावरील आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी झाले आणि संमेलनाच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केले.

‘डिजिटल परिवर्तन आणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण” या विषयावरील या आंतरराष्ट्रीय संमेलनात प्रधान, डेकिन विद्यापीठाचे कुलगुरू इयान मार्टिन, सुब्रमण्यम रामादोराई, ओ.पी.जिंदाल विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. सी. राजकुमार, मॅथ्यू जॉन्स्टन आणि भारत आणि ऑस्ट्रेलियातील इतर विचारवंतांबरोबर सहभागी झाले होते.

प्रधान म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामायिक मूल्यांवर आधारित दीर्घकालीन संबंध आहेत. शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रातील आपली भागीदारी अधिकाधिक मजबूत होत आहे. औद्योगिक क्रांती 4.0. चे नेतृत्व करण्याची भारताची आकांक्षा आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानची भागीदारी या प्रवासात महत्वाची भूमिका बजावेल. प्रधान पुढे म्हणाले की ज्ञान हा कोणत्याही संस्कृतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. भारतीय संस्कृती नेहमीच ज्ञानाधारित आणि ज्ञान-प्रणित राहिली आहे. हाच वारसा पुढे नेत, भारत एनईपी (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) 2020 लागू करत आहे. 15-25 वयोगटातील मोठ्या लोकसंख्येला शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देणे हे आजचे आव्हान आहे. ते असेही म्हणाले की भारतात एक नवीन “डिजिटल जीवनशैली” आकार घेत आहे. 2023 च्या अखेरीपर्यंत स्वदेशी 5G सेवेपासून, डिजिटल पेमेंटमधील जागतिक नेतृत्व, आगामी डिजिटल विद्यापीठ आणि सर्व गावांना हाय-स्पीड इंटरनेट सेवेला जोडणे, याद्वारे भारताचे डिजिटायझेशन नवीन संधी निर्माण करत आहे.
R.Aghor /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862622)