आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 217कोटी 41 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील लसमात्रा 4 कोटी 09 लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 44,436 इतकी आहे

गेल्या 24 तासांत देशात 4,912 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.71%आहे

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.69% आहे

Posted On: 24 SEP 2022 11:19AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 217.41 कोटींचा (2,17,41,04,791) टप्पा ओलांडला आहे.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 09  लाखांहून अधिक (4,09,22,085) ) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414963

2nd Dose

10116671

Precaution Dose

6973890

FLWs

1st Dose

18436408

2nd Dose

17713336

Precaution Dose

13562449

Age Group 12-14 years

1st Dose

40922085

2nd Dose

31491154

Age Group 15-18 years

1st Dose

61909668

2nd Dose

52942987

Age Group 18-44 years

1st Dose

561163460

2nd Dose

515334360

Precaution Dose

89136052

Age Group 45-59 years

1st Dose

204009795

2nd Dose

196859955

Precaution Dose

46235746

Over 60 years

1st Dose

127653951

2nd Dose

123071976

Precaution Dose

46155885

Precaution Dose

20,20,64,022

Total

2,17,41,04,791

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 44,436 इतकी आहेदेशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.10%  आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.71%. झाला आहे. गेल्या 24 तासांत 5,719 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,39,90,414. झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 4,912 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण  3,03,888 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 33लाखांहून अधिक (89,33,52,145) ) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.69% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.62%. इतका नोंदला गेला आहे.

***

M.Jaybhaye/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861899) Visitor Counter : 126