कायदा आणि न्याय मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांच्या प्रोसीक्युटर जनरल यांची 20 वी बैठक कझाकिस्तानमधील अस्ताना येथे संपन्न
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2022 9:57PM by PIB Mumbai
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांच्या प्रोसीक्युटर जनरल यांची 20 वी बैठक 23 सप्टेंबर 2022 रोजी अस्ताना, कझाकिस्तान येथे झाली. कझाकिस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या बैठकीला भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व यांनी केले :-
i तुषार मेहता, भारताचे सॉलीसीटर जनरल , कायदे विभाग
ii डॉ. अंजू राठी राणा, अतिरिक्त सचिव , कायदे विभाग

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदे विभागाच्या अतिरिक्त सचिव डॉ. अंजू राठी राणा या 23 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित कार्यक्रमापूर्वी शांघाय सहकार्य संघटनेच्या महाभियोक्त्यांच्या 20 व्या बैठकीसाठी 8 आणि 13 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या तज्ज्ञ गटाच्या बैठकीला उपस्थित होत्या. तज्ज्ञ गटाच्या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्तरावर सहकार्य दृढ करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. तज्ज्ञांच्या गटाने जगातील बहुराष्ट्रीय वाढत्या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. सदस्य देशांमधील चर्चा विधायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली ज्यामध्ये परस्पर विश्वास दृढ झाला.

प्रोसीक्युटर जनरलच्या 20 व्या बैठकीला तुषार मेहता उपस्थित होते. 20 व्या बैठकीच्या चर्चेचा समावेश असलेल्या एक प्रोटोकॉलवर सदस्य राष्ट्रांनी स्वाक्षरी केली आणि तो स्वीकारला.
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या महाभियोक्त्यांची पुढील (21 वी) बैठक 2023 मध्ये चीनमध्ये होणार आहे.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1861862)
आगंतुक पटल : 247