PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
23 SEP 2022 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 23 सप्टेंबर 2022
- 217.26 cr Total Vaccine doses (94.73 cr Second Dose and 20.07 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 14,91,017 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 45,281
- Active cases stand at 0.10%
- Recovery Rate currently at 98.71%
- 6,424 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,39,84,695
- 5,383 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (1.68%)
- Weekly Positivity Rate (1.70%)
- 89.30 cr Total Tests conducted so far; 3,20,187 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCoron
Press Information Bureau
Ministry of Information & Broadcasting
Government of India
*****
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, भारतात दिल्या गेलेल्या कोविड-19 च्या लसमात्रांची संख्या 217 कोटी 26 लाखांवर (2,17,26, 27,951) पोहोचली आहे.
12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरणाला 16 मार्च 2022 रोजी सुरूवात झाली. आतापर्यंत 4 कोटी 8 लाखाहून जास्त (4,08,99,936) बालकांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे. त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची खबरदारीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.
भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 45 हजार 281 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.10% आहे.
भारतात कोविडमुक्त होण्याचा दर 98.71% आहे. देशात गेल्या 24 तासात, 6,424 कोरोना रुग्ण बरे झाले आणि देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकूण संख्या 4,39, 84,695 इतकी आहे.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5,383 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात कोविड 19 च्या एकूण 3, 20, 187 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 30 लाखांच्या वर (89,30,48,257) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.70 %, तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.68 % आहे.
इतर अपडेटस्
भारत सरकारतर्फे आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या मात्रांचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना होत असलेला मोफत पुरवठा आणि राज्यांनी केलेली लसीची थेट खरेदी यांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 203 कोटी 42 लाखांहून अधिक (2,03,42,90,125) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे यापुढील काळातील लसीकरणासाठी कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या अशा सुमारे 3 कोटी 51 लाख (3,51,46,410) मात्रा, अजूनही शिल्लक आहेत.
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861858)
Visitor Counter : 199