इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
कर्मचारी-उद्योजकांच्या युगात - उद्योगांचे कॅप्टिव्ह मॉडेल अयशस्वी होऊ शकते - जिथे कर्मचारी एकाच वेळी एकापेक्षा जास्त नियोक्त्यासाठी काम करतात या व्यवस्थेसंदर्भात बोलताना राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले मत
Posted On:
23 SEP 2022 8:17PM by PIB Mumbai
हे कर्मचारी-उद्योजकांचे युग आहे आणि, तरुण भारतीय तंत्रज्ञान जाणकार मनुष्यबळाच्या मनात आणि वृत्तींमध्ये रचनात्मक बदल झाला आहे हे आता कॉर्पोरेट्स/कंपन्यांनी समजून घेतले पाहिजे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत भारतीय सार्वजनिक व्यवहार मंचाच्या (पीएएफआय ) 9 व्या वार्षिक मंच 2022 ला संबोधित करत होते.
मूनलायटिंग अर्थात जिथे कर्मचारी एकाच वेळी एकापेक्षा जास्त नियोक्त्यासाठी काम करतात या मुद्द्यावर बोलताना मंत्री म्हणाले की, जेव्हा कर्मचार्यांनी मोठ्या औद्योगिक आस्थापनांमध्ये काम सुरु केले आणि त्यांचे आयुष्य नोकरी करून घालवले ते दिवस आता मागे पडले आहेत. आजच्या तरुणांमध्ये कमावण्याची इच्छा, स्वतःच्या कौशल्याची अधिक मूल्ये निर्माण करण्याची इच्छा आणि आत्मविश्वासाची भावना आहे. त्यामुळे , ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांवर निर्बंध घालत तुम्ही स्वतःच्या स्टार्ट-अपसाठी काम करू नका असे म्हणायचे आहे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरतील,” असे त्यांनी सांगितले.
''कोणतीही कॅप्टिव्ह मॉडेल्स निष्प्रभ होत जातील. आता सेवा देताना कर्मचार्यांनी उद्योजक व्हावे अशी नियोक्त्याची अपेक्षा असते. तेच लोक स्वतःला ही गोष्ट वैयक्तिकरित्या लागू करू शकतात. अशी एक वेळ येईल जिथे उत्पादन व्यावसायिकांचा एक समुदाय असेल जो अनेक प्रकल्पांसाठी आपला वेळ विभागून घेईल ज्याप्रमाणे वकील किंवा सल्लागार करतात, कामाचे हेच भविष्य आहे'',असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे त्यांनी सांगितले की, जिथे कर्मचारी एकाच वेळी एकापेक्षा जास्त नियोक्त्यासाठी काम करतात या व्यवस्थेने कोणत्याही कराराच्या दायित्वांचे उल्लंघन करू नये.
लवकरच हितसंबंधितांशी सल्लामसलत करण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या डिजीटल इंडिया विधेयकाविषयी बोलताना मंत्री म्हणाले की, हे विधेयक अधिक रचनात्मक असेल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशिष्ट बदल आणि अडथळ्यांची ते दखल घेईल.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861834)
Visitor Counter : 211