संरक्षण मंत्रालय
जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाने केला ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड अर्थात बीएपीएलशी करार
Posted On:
22 SEP 2022 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आज ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड अर्थात बीएपीएलशी करार केला. या करारामुळे एकूण अंदाजे 1700 कोटी रूपये किमतीची अतिरिक्त दुहेरी भूमिका बजावणारी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत. ‘बाय इंडियन’ श्रेणीतील या क्षेपणास्त्रे ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारतीय नौदलाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
बीएपीएल ही भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त कंपनी असून नव्या आवृत्तीतील जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रांची क्षमता वाढविण्यासाठी तिचे महत्त्वाचे योगदान आहे. जमीन तसेच जहाजांवरचे हल्ले परतवून लावण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढविल्यामुळे ही क्षेपणास्त्रे दुहेरी भूमिका बजावतील
शस्त्रास्त्र प्रणाली आणि दारूगोळा यांच्या देशांतर्गत उत्पादनाला या करारामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे देशी उद्योगांचा सक्रिय सहभागही वाढेल.
R.Aghor /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861613)
Visitor Counter : 368