विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
शरीरातील द्रवपदार्थांमधून कर्करोगाच्या पेशींचे निदान करण्यात शरीरातील साखर-लेपन केलेल्या लहान चंचीसारख्या पिशव्या मदत करू शकतात
प्रविष्टि तिथि:
22 SEP 2022 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
संशोधकांनी अलीकडेच विकसित केलेल्या नव्या आण्विक बायोसेन्सरच्या मदतीने कर्करोगामुळे शरीरात तयार होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा शोध घेणे अधिक सोपे होऊ शकेल.
कर्करोगाच्या पेशी साखरेच्या रेणूंनी भरलेल्या पेशीबाह्य चंची सदृश्य लहान द्रवाचे भरलेल्या पिशव्या (एक्स्ट्रासेल्युलर वेसिकल्स ,EV), तसेच हाअल्युराॅन ( Hyaluronan ,HA), ज्याचा ट्यूमरच्या अनिर्बंध वाढीची थेट संबंध आहे आणि ,तो मोठ्या आतड्याच्या,अखेरच्या भागाच्या (कोलन) कर्करोगाच्या लवकर निदानासाठी संभाव्य जैविक खूण(बायोमार्कर) मानला जातो, तो तयार करतात .या पेशींच्या बाह्य भागातील सूक्ष्म द्रव पिशव्या (EVs)शरीरातील द्रवांमध्ये (रक्त, विष्ठा, इ.) मुबलक प्रमाणात असतात आणि सर्व प्रकारच्या पेशी या ईव्हीज (EVs)पेशीबाहेरील मॅट्रिक्समध्ये विशिष्ट स्राव तयार करत असतात.या शरीरातील द्रवपदार्थांमध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींपेक्षा किमान दुप्पट जास्त (EVs)स्त्राव स्रवत रहातात. म्हणून कर्करोगाचे निदान लवकर करण्यासाठी या ईव्हीज (EVs) रुग्णाच्या शरीरापासून अनाक्रमक पद्धतींद्वारे पण (शरीराला इजा न पोहोचता)वेगळ्या केल्या जातात.
या एचए साखरेचा कर्करोगाच्या ईव्हीशी संबंधित असलेला रेणू विकृत (पॅथॉलॉजिकल) परिस्थितीत हायलुरोनिडेसेस (हायल्स) आणि प्रतिक्रियाशील ऑक्सिजन प्रजातींद्वारे विखंडित होतो जो ट्यूमरच्या प्रगतीमधील धोक्याचे संकेत देऊ शकतो,हे सर्वज्ञात आहे.
डॉ. एस.एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस (SNBNCBS), कोलकाता, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स यांच्या सहकार्याने, शिव नाडर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स, दिल्ली येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) च्या इन्स्पायर फॅकल्टी अनुदानाद्वारे समर्थित तातिनी रक्षित प्रयोगशाळा , कोलकाता आणि आय आयटी,भिलाई, छत्तीसगड येथील संशोधकांनी ईव्ही पृष्ठभागावरून काढलेल्या कर्करोगाच्या पेशी- वरील एचएची सम उच्च लांबी उलगडली आहे.
त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, कर्करोगाच्या एकल ईव्ही-व्युत्पन्नपेशीला एच ए रेणूंच्या (500 नॅनोमीटरपेक्षा कमी सम उच्च लांबी) अत्यंत सूक्ष्म आकाराच्या साखळ्यांनी लेपित केले आहे आणि या HA- कोटेड ईव्ही व्युत्पन्न लहान साखळ्या सामान्य पेशीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक लवचिक आहेत, हे स्पष्ट झाले आहे कर्करोगात ही एचए कोटेड ईव्ही (HA-coated EVs) ची आंतरिक लवचिकता त्यांना पेशीबाह्य वाहतूक, शोषण, पेशींद्वारे उत्सर्जन, पेशींच्या पृष्ठभागांना चिकटून राहणे,यादरम्यान अनेक बाह्य शक्तींचा सामना करण्यास मदत करते.
हा अभ्यास नुकताच जर्नल ऑफ फिजिकल केमिस्ट्री लेटर्समध्ये प्रकाशित झाला आहे. हे निष्कर्ष साखर-लेपित पाउच कर्करोगाचा धोका कसा वाढवतात यावर प्रकाश टाकतात.
संशोधन प्रबंधाची लिंक
https://pubs.acs.org/doi/full/10.1021/acs.jpclett.2c01629)

R.Aghor /S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1861560)
आगंतुक पटल : 269