सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
आरोग्य क्षेत्रातील सहकार्यासाठी राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ आणि आंध्र प्रदेशातील मेडटेक झोन लिमिटेड यांच्यात झाला सामंजस्य करार
Posted On:
22 SEP 2022 12:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ(नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड,NSIC)आणि आंध्र प्रदेश मेडटेक झोन लिमिटेड (AMTZ),यांच्यात आरोग्य सेवा क्षेत्रातील सहकार्यावर झालेल्या सामंजस्य करारावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाचे सचिव (एमएसएमई) बी.बी.स्वेन,आणि इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

या सामंजस्य करारावर राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक गौरांग दीक्षितआणि एएमटीझेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, डॉ. जितेंद्र शर्मा, यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

एनएसएनआयसी आणि एएमटीझेड मधील या सामंजस्य करारावरील स्वाक्षऱ्या हे आरोग्य सेवा क्षेत्रातील एमएसएमईची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल,असे नारायण राणे यांनी यावेळी नमूद केले.यामुळे दोन्ही संस्था एकमेकांच्या कौशल्याचा लाभ घेऊ शकतात आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील एमएसएमईसाठी जागतिक स्तरावर सहयोग करण्यासाठी आणि या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी उत्कृष्ट संधी निर्माण करू शकतात,असेही त्यांनी असेही नमूद केले. सामंजस्य करारानुसार कार्यवाही करण्यासाठी आणि वैद्यकीय उपकरण/आरोग्य सेवा क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावरील उत्पादक आणि निर्यातदार बनवल्याबद्दल एनएसएनआयसी आणि एएमटीझेडला शुभेच्छा दिल्या.
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861428)
Visitor Counter : 159