पंचायती राज मंत्रालय
‘पुरेसे पाणी उपलब्ध असलेली तसेच स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत’: संकल्पना 4 आणि 5 वर आधारित संकल्पनात्मक दृष्टीकोनाचा अवलंब करून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचा उद्या पुणे येथे प्रारंभ
Posted On:
21 SEP 2022 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022
‘पुरेसे पाणी उपलब्ध असलेली तसेच स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत : संकल्पना 4 आणि 5 वर आधारित संकल्पनात्मक दृष्टीकोनाचा अवलंब करून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा महाराष्ट्रातील पुणे येथे प्रारंभ होत आहे. ही कार्यशाळा भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने, महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार आणि महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार,आणि इतर मान्यवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आभासी पद्धतीने समारोप सत्राला उपस्थित राहतील आणि समारोपाचे भाषण करतील.
कार्यशाळेत पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार, ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा, पेयजल आणि स्वच्छता विभाग, जल शक्ती मंत्रालयाच्या सचिव विनी महाजन, जलशक्ती मंत्रालयातील जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या अतिरिक्त सचिव अर्चना वर्मा विविध तांत्रिक सत्रांचे अध्यक्षस्थान भूषवतील.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन आणि इतर मान्यवर उद्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर विविध विकासात्मक योजना, उपक्रम आणि पंचायती राज संस्थांचे क्षेत्रातील यश दर्शविणाऱ्या विविध स्टॉल्सना भेट देतील.
या राष्ट्रीय कार्यशाळेला महाराष्ट्रासह देशभरातील पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कार्यशाळेत सुमारे 1,500 लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सहभागींमध्ये ग्रामपंचायतींतून निवडून आलेले प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, जिल्हा परिषदेतील आणि इतर विभागांचे अधिकारी, मुख्य भागधारक, तज्ञ तसेच पाणी आणि स्वच्छतेविषयी उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा समावेश असेल.
S.Kulkarni /Prajna/Sonal C/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861337)
Visitor Counter : 254