युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
14,000 युवा स्वयंसेवकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रारंभ
Posted On:
21 SEP 2022 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022
"पंतप्रधानांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सांगितलेले पंच प्रण (पाच प्रतिज्ञा ) साकार करण्यासाठी एनवायकेएस म्हणजेच नेहरू युवा केंद्र संघटनेचे प्रशिक्षित युवा स्वयंसेवक महत्वाची भूमिका बजावतील'', असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले. देशभरातील नेहरू युवा केंद्र संघटनेच्या 14,000 युवा स्वयंसेवकांच्या ऑनलाइन क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचा दिल्लीतील शास्त्री भवन येथे औपचारिक प्रारंभ करताना ते आज बोलत होते.

"प्रशिक्षण कार्यक्रमाचा आशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. आणि त्यात संवाद कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, निर्णय घेणे इत्यादी सखोल अभ्यासाचा समावेश आहे. आज येथे उपस्थित असलेले सर्व तरुण तुम्ही जे क्षेत्र निवडाल - समाजसेवा, राजकारण, उद्योजकता इ. त्या संबंधित क्षेत्रात भविष्यातील नेते होणार आहात. भविष्यात भारताला कुशल मनुष्यबळ असलेला जगातील सर्वात मोठा देश बनवण्याच्या उद्देशासह अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे तरुणांना समग्र शिक्षण मिळेल आणि त्यांना त्यांचे ज्ञान वाढवण्यास मदत होईल असे अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले. "या महत्त्वाकांक्षी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश हा जीवन कौशल्ये वाढवणे आणि नेहरू युवा केंद्र संघटनेच्या युवा स्वयंसेवकांची क्षमता वाढवणे हा आहे जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याबरोबरच ते राष्ट्रीय विकास प्रक्रियेत अर्थपूर्ण भूमिका बजावू शकतील आणि योगदान देऊ शकतीलअसे सांगत मंत्र्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा अधोरेखित केली.
ऑनलाइन प्रशिक्षणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, सीबीसी(क्षमता बांधणी आयोग ) , यूएनआयटीएआरने (संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्था ) एनवायकेएसशी सल्लामसलत करून प्रशिक्षण रूपरेषा तयार केली आणि जानेवारी 2022 मध्ये 100 युवा स्वयंसेवकांमध्ये त्याची व्यवहार्यता चाचणी घेण्यात आली.सहभागी युवा स्वयंसेवकांच्या अभिप्रायाच्या आधारे आणि एनवायकेएस कायर्क्रम कृती नमुना विचारात घेऊन रूपरेषा सुधारित करण्यात आली आहे.
S.Kulkarni /S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861323)
Visitor Counter : 233