आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण
मॉनिटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर(एमएएस) आणि आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्यविषयक सेवा केंद्र प्राधिकरण(आयएफएससीए) सिंगापूर आणि भारतादरम्यान फिनटेक नवोन्मेषासाठी प्रयत्न करणार
Posted On:
18 SEP 2022 9:42PM by PIB Mumbai
मॉनिटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूर (एमएएस) आणि आंतरराष्ट्रीय अर्थसहाय्यविषयक सेवा केंद्र प्राधिकरण(आयएफएससीए) यांनी आज फिनटेक क्षेत्रात नियामक सहकार्य आणि भागीदारीला चालना देण्यासाठी फिनटेक सहकार्य करार(सीए) केला.
हा सहकार्य करार पुढील बाबींना प्रोत्साहन देईल
- रेग्युलेटरी सँडबॉक्स कोलॅबरेशन – एमएएस आणि आयएफएससीए तंत्रज्ञानविषयक नवोन्मेषांच्या प्रयोगशीलतेला पाठबळ देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रेग्युलेटरी सँडबॉक्सेसना आपापल्या अधिकारक्षेत्रात बळकट करेल
- माहितीची देवाणघेवाण – एमएएस आणि आयएफएससीए वित्तीय उत्पादने आणि सेवा याविषयीच्या बिगर पर्यवेक्षकीय माहितीची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतील, उदयोन्मुख फिनटेक विषयांवर चर्चा करतील आणि संयुक्त नवोन्मेषी प्रकल्पांमध्ये सहभागी होतील.
एमएएसचे मुख्य फिनटेक अधिकारी सोपनेंदू मोहंती आणि आयएफएससीएचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोसेफ जोशाय यांनी या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जुलै 2022 मध्ये एमएएस आणि आयएफएससीए यांच्या झालेल्या सामंजस्य कराराच्या आधारावर हा सहकार्य करार झाल्याची माहिती मोहंती यांनी दिली. सिंगापूर आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकरणांच्या हाताळणीमुळे बहु अधिकारक्षेत्रांचा समावेश असलेल्या फिनटेक वापराच्या प्रकरणांसाठी एक व्यापक सहकार्य चौकट कार्यरत करण्याचा मार्ग मोकळा होईल.
अधिक माहितीसाठी कृपया www.ifsca.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860431)
Visitor Counter : 180