सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचे उद्घाटन

Posted On: 18 SEP 2022 7:30PM by PIB Mumbai

 

देशभरात पसरलेली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रे (DDRC) गेल्या दोन दशकांपासून दिव्यांग व्यक्तींना प्रभावी पुनर्वसन सेवा देत आहेत. ही केंद्रे जिल्हा दंडाधिकारी /जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा व्यवस्थापन संघ आणि एक नामांकित गैर सरकारी संस्था (एनजीओ) (सामान्यत: इंडियन रेड क्रॉस सोसायटी) यांच्याद्वारे संयुक्तपणे चालवली जातात. त्यांच्या  सेवांमध्ये वाढ करण्यासाठी, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सक्षमीकरण विभागाद्वारे  एका आदर्श जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) संकल्पना मांडण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात अशा नऊ म्हणजे- बदाऊन, पिलीभीत, बरेली, बालाघाट, गोलाघाट, अहमदाबाद, अमरावती, कुल्लू आणि रामपूर यांच्यात आदर्श जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र  म्हणून पहिल्या टप्प्यात  सुधारणा करण्यात आल्या  आहेत. या 09 आदर्श जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचे  उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री  डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान, विविध राज्ये आणि जिल्हा अधिकारी, आमदार आणि खासदार संबंधित स्थळी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यमान डीडीआरसींना आदर्श डीडीआरसी बनवण्यासाठी  केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांविषयी यावेळी अधिका-यांनी माहिती दिली. या व्हर्च्युअल उद्घाटनादरम्यान सुधारित केलेल्या डीडीआरसीची विविध छायाचित्रेही दाखवण्यात आली.

या प्रसंगी डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सर्व आदर्श डीडीआरसींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि डीडीआरसी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेल्या सकारात्मक बदलांविषयी माहिती दिली. ज्यामुळे या डीडीआरसी अधिक पारदर्शी आणि व्यापक झाल्या आहेत, ज्यामध्ये  पदांची संख्या सध्याच्या 12 वरून 15 पर्यंत वाढवण्यात आली आहे,आता नवीन डीडीआरसीची जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा तात्काळ इंटरव्हेन्शन केंद्राशी समीपता वाढविण्यात आली आहे, आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सुलभ केली गेली आहे.

आदर्श डीडीआरसीमध्ये श्रवणयंत्र चाचणी प्रयोगशाळा, स्पीच थेरपी रूम, व्हिज्युअल थेरपी रूम, सायकोलॉजिस्ट रूम, फिजिओथेरपिस्ट रूम, गेट प्रॅक्टिस पॅरलल बार आणि टेली-मेडिसिन/टेली-थेरपी सारख्या सेवा उपलब्ध आहेत. याशिवाय, हे DDRC, आता PwD ला UDID पोर्टलच्या नोंदणीमध्ये मदत करेल. हे डीडीआरसी पीडब्ल्यूडींना दर्जेदार पुनर्वसन सेवा प्रदान करण्यासाठी मैलाचा दगड म्हणून सिद्ध होतील आणि भविष्यात येणाऱ्या नवीन डीडीआरसीसाठी एक उदाहरण प्रस्थापित करतील.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860418) Visitor Counter : 269


Read this release in: Hindi , English , Urdu , Telugu