रेल्वे मंत्रालय
मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या प्रकल्पा संबंधीच्या संयुक्त कार्यगटाची 6 वी बैठक आज झाली
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2022 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड प्रकल्पा संबंधीच्या संयुक्त कार्यगटाची सहावी बैठक आज झाली. रेल्वेचे मुख्य आयुक्त आणि रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. त्रिपाठी आणि जपानचे राजदूत सतोशी सुझुकी यांनी या बैठकीचे संयुक्तपणे अध्यक्ष पद भूषविले.
या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांवरील निर्णयांना मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या गटाने हाय स्पीड प्रकल्पाशी संबंधित सहकार्याच्या विविध मुद्यांवर देखील चर्चा केली.
S.Patil /V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1859957)
आगंतुक पटल : 155