दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असल्या तरी उद्योगांनाही सेवांचा दर्जा सुधारून त्यांचे योगदान द्यावे लागेल - अश्विनी वैष्णव


दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी शेवटच्या घटकापर्यंत संपर्क व्यवस्था महत्त्वाची - देविसिंह चौहान

या वर्षीच्या वार्षिक महोत्सवाची संकल्पना होती, फाईव जी आणि त्याही पलिकडे गती शक्तीची दूरदृष्टी अर्थात “गती शक्ती व्हिजन फॉर फाईव जी अँड बियाँड”

Posted On: 15 SEP 2022 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

देशातील दूरसंचार क्षेत्रात येत्या काही वर्षांत आणखी सुधारणा घडून येतील अशात सेवेचा दर्जा सुधारून दूरसंचार उद्योगालाही आपले काम करावे लागेल आणि प्रतिपूर्ती करावी लागेल, असे दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ते काल येथे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशनच्या (डीआयपीए) वार्षिक फ्लॅगशिप इव्हेंट 2022 ला संबोधित करत होते. भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा प्रदाता उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी ही सर्वोच्च उद्योग संस्था आहे. यावेळी दळणवळण राज्यमंत्री देविसिंह चौहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सेवेच्या गुणवत्तेच्या मापदंडांमध्ये लक्षणीय वाढ करणे आवश्यक आहे आणि दूरसंचार विभागाने या संदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) शी संपर्क साधावा असे अश्विनी वैष्णव म्हणाले. त्यांनी दूरसंचार विभागाला सल्ला दिला की ट्रायकडे नवीन मार्गदर्शनपत्रे पाठवावीत जेणेकरुन सेवा-गुणवत्तेचे मापदंड लक्षणीयरीत्या वाढवून ते आजच्या तुलनेत तीन ते चार पटीने कार्यक्षम ठरतील.

5जी चा प्रवास खूप रोमांचक असणार आहे असे सांगत अनेक देशांना 40% ते 50% व्याप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागली असे त्यांनी नमूद केले. परंतु आम्ही अत्यंत आक्रमकपणे कालबद्ध लक्ष्याचा पाठलाग करीत आहोत. सरकारने कमी कालावधीत 80% व्याप्तीचे लक्ष्य दिले आहे आणि आम्ही निश्चितपणे कमी कालावधीत किमान 80% व्याप्ती गाठू, असेही ते म्हणाले.

दूरसंचार ऑपरेटर आणि पायाभूत सुविधा पुरवठादारांसह उद्योगांनी देशातील सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुढे जाण्यासाठी, आता अनेक सुधारणा जाहीर केल्या गेल्या आहेत आणि बरीच पावले उचलली आहेत. उपाययोजना, पुढाकार एकतर्फी असू शकत नाहीत दोन्ही बाजूंनी यावर सहकार्य केले पाहिजे, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

आपला देश विकसनशील देश ते विकसित देश असा बदलत आहे आणि हे साध्य करण्यासाठी दूरसंचार क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे दळणवळण राज्यमंत्री देविसिंह चौहान म्हणाले. त्यांनी पंतप्रधानांच्या सुधारणा (रिफॉर्म), कामगिरी (परफॉर्म) आणि परिवर्तन  (ट्रान्सफॉर्म) या त्रयीचा संदर्भ दिला  आणि असे म्हटले की ते या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी  घोषवाक्य असायला हवे. 

दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी शेवटच्या घटकापर्यंत संपर्क व्यवस्था महत्त्वाची आहे. दूरसंचार ऑपरेटर्सनी या दिशेने कठोर परिश्रम घ्यावेत असा सल्ला देविसिंह चौहान दिला. ते पुढे म्हणाले की 5जी कनेक्टिव्हिटीने आरोग्य, शिक्षण, खाणकाम, वाहतूक, लॉजिस्टिक्स इत्यादी क्षेत्रात मोठी भूमिका बजावली पाहिजे. या संदर्भात डीआयपीएने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे, असेही ते म्हणाले.

या वर्षीच्या वार्षिक महोत्सवाची संकल्पना होती, फाईव जी आणि त्याही पलिकडे गती शक्तीची दूरदृष्टी अर्थात गती शक्ती व्हिजन फॉर फाईव जी अँड बियाँड

कार्यक्रमादरम्यान,  ‘गतीशक्ती — भारतात गतीशील डिजिटल पायाभूत सुविधांसाठी मार्ग प्रशस्त’ या शीर्षकाची ईवाय-डीआयपीएची श्वेतपत्रिकाही प्रकाशित झाली. 5जी चे आगमन भारतासाठी चित्र पालटवून टाकणारे ठरणार आहे आणि त्याचा सामाजिक-आर्थिक क्षेत्रात खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे या वस्तुस्थितीवर या श्वेतपत्रिकेने लक्ष्य केन्द्रित केले आहे. 5जी मुळे डेटा ट्रॅफिकमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे, परिणामी दूरसंचार उद्योगातील कल आणि भविष्यावर मुख्य लक्ष केंद्रित करून विद्यमान नेटवर्क अद्यायावत करणे आणि नवीन ग्रीनफील्ड तयार करणे आवश्यक आहे.

ट्रायचे अध्यक्ष, आयएएस, डॉ. पी. डी. वाघेला, डीसीसी चे अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे (डीओटी) सचिव (टी), आयएएस के. राजारामन, मणिपूरचे मुख्य सचिव डॉ. राजेश कुमार, दूरसंचार विभागाचे संयुक्त सचिव, आयएएस आनंद सिंग, रेलटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार, दूरसंचार विभागाचे महासंचालक, सुभाष चंद, एसेंड टेलिकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुशील कुमार चतुर्वेदी, एपीएसी, जीएसएमएच्या सार्वजनिक धोरण प्रमुख जीनेट व्हाईट, एपीएसीचे संशोधन प्रमुख जॅक हॅडन, टॉवर एक्सचेंजचे मिलिंद जोशी, पार्टनर - ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्सचे महीप जैन, मॅक्वेरी कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक यावेळी उपस्थित होते.

 

G.Chippalkatti /V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859576) Visitor Counter : 171