युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील क्रीडा विकासासाठी 215 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यासाठी राष्ट्रीय क्रीडा विकास निधीने एनटीपीसी आणि आरईसीसह केला ऐतिहासिक सामंजस्य करार


हा सामंजस्य करार भारताची सॉफ्ट पॉवर निर्माण करण्यास मदत करेल: अनुराग ठाकूर

देशात क्रीडा संस्कृती निर्माण करणे हा राष्ट्र उभारणीचा भाग : आर.के. सिंह

Posted On: 14 SEP 2022 8:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

भारतातील क्रीडा विकासासाठी,केंद्रीय युवा व्यवहार आणि  क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आज  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधीने  (एनएसडीएफ)  एनटीपीसी (राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ ) फाउंडेशन आणि आरईसी (ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ ) फाउंडेशन या  दोन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत  (पीएसयू) ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या कराराअंतर्गत एनटीपीसीकडून पुढील 5 वर्षात 115 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे आणि ते भारतातील तिरंदाजी क्रीडाप्रकाराला  पाठबळ देईल. आरईसी फाऊंडेशन  महिला हॉकी, थलेटिक्स आणि मुष्टियुद्ध खेळाला सहाय्य करण्यासाठी 3 वर्षांमध्ये 100 कोटी रुपयांचे सहाय्य करणार आहे.  कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या  (सीएसआर ) माध्यमातून एनएसडीएफला हे पाठबळ मिळाले आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या दोन सार्वजनिक उपक्रमांनी क्रीडा विकासासाठी एकूण 215 कोटीं रुपयांचे  योगदान दिले असून  हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, असे यावेळी बोलताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ऊर्जा मंत्रालयाने दिलेले हे योगदान क्रीडा क्षेत्राला दीर्घकाळ ऊर्जा देण्याचे  काम करेल, असे ते म्हणाले. "कॉर्पोरेट्सपासून ते व्यक्तींपर्यंत आणि विविध संस्थांपासून ते राज्यांपर्यंत प्रत्येकाने एक संघ म्हणून एकत्र काम केले पाहिजे.या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने आपल्या  क्रीडापटूंना मोठे प्रोत्साहन  मिळेल.असे  ठाकूर यांनी सांगितले.

अनुराग ठाकूर म्हणाले की, यापूर्वी, मी एनएसडीएफमध्ये ऑनलाइन देणग्या देण्याच्या , खेळाडू, खेळ आणि अकादमी दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे घडले आहे.अनेक सार्वजनिक उपक्रम आहेत जे पुढे येऊन भारताची सॉफ्ट पॉवर तयार करण्यात मदत करतात,खेळाडूंना व्यसनापासून दूर ठेवण्यास मदत करतात  आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतात, असे ठाकूर यांनी सांगितले.

"एनटीपीसी आणि आरईसीच्या माध्यमातून भारतातील क्रीडा क्षेत्राच्या पुढील विकासासाठी काहीतरी योगदान  दिल्याबद्दल  ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने  आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे आर के सिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देताना नमूद केले. देशात क्रीडा संस्कृती निर्माण करणे हा राष्ट्र उभारणीचा भाग आहे, असे सांगत आमचे मंत्रालय देशातील क्रीडा विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल'' अशी ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

S.Kulkarni /S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1859364) Visitor Counter : 214


Read this release in: English , Urdu , Hindi