खाण मंत्रालय
कोळसा क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून राज्यांबरोबर भागीदारीत राबवण्यासाठी अनेक सुधारणा
Posted On:
10 SEP 2022 9:45PM by PIB Mumbai
कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते काल, 9 सप्टेंबर 2022 रोजी हैदराबाद येथे राष्ट्रीय खाण मंत्री परिषदेचे (NMMC) उद्घाटन झाले.
दोन दिवसीय या परिषदेचे कोळसा मंत्रालयाने संचालन केले.
राष्ट्रीय खाण मंत्री परिषद म्हणजे कोळसा क्षेत्राला आत्मनिर्धार बनवणे आणि भारतात शाश्वत खाणकामाला प्रोत्साहन देणे या दिशेने टाकलेले अजून एक पाऊल आहे.
परिषदेमध्ये कोळसा क्षेत्रातील सुधारणा, त्यांचे परिणाम , कोळसा खाणकामासाठी भू संपादन, कोळशाची वाहतूक आणि मंजूर केलेल्या कोळसा खाणीं कार्यान्वित करणे या बाबतीत चर्चा झाली.
कोळसा क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांच्या भागीदारीत राबवण्यासाठी अनेक सुधारणा जारी केल्या आहेत. या सुधारणा करताना कोळसा मंत्रालयाकडून राज्यांचे हित लक्षात घेतले गेले आहे असे चर्चेदरम्यान स्पष्ट करण्यात आले.
मंत्रालयाकडून सुचवण्यात आलेल्या अत्याधुनिक सुधारणांचा आढावासुद्धा या परिषदेत घेण्यात आला.
या परिषदेत ओरिसा, महाराष्ट्र, आसाम, मिझोराम, उत्तराखंड या राज्यांचे खाणकाम मंत्री आणि जम्मू काश्मीर कोळसा मंत्रालयाचे सचिव, झारखंडचे कोळसा विभागाचे व्यवस्थापक आणि छत्तीसगडचे खाणकाम विभागाचे संयुक्त अध्यक्ष यांनी आपले विचार मांडले तसेच काही सूचना केल्या.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858370)
Visitor Counter : 152