गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा  यांच्या हस्ते आज  जैसलमेरमध्ये सीमाभाग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत श्री तनोट मंदिर संकुल प्रकल्पाची पायाभरणी आणि भूमिपूजन


अमित शहा यांनी तनोट मातेचे घेतले दर्शन आणि देश तसेच  देशवासियांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी केली प्रार्थना

सीमांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या  शूरवीरांना तनोट विजयस्तंभ येथे अभिवादन करून केंद्रीय गृहमंत्र्यांनी कृतज्ञ देशाच्या  वतीने वाहिली आदरांजली

या प्रकल्पामुळे तनोट आणि जैसलमेरच्या सीमावर्ती भागाचा विकास होईल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील यामुळे  स्थलांतर थांबून  त्या भागाची सुरक्षाही होईल बळकट

Posted On: 10 SEP 2022 5:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा यांनी आपल्या राजस्थान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज सीमाभाग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जैसलमेर येथील श्री तनोट  मंदिर परिसर प्रकल्पाची पायाभरणी आणि भूमिपूजन केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001YKCR.jpg

तनोट विजय स्तंभयेथे आपल्या सीमांच्या  सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना  अभिवादन करून अमित शहा यांनी कृतज्ञ देशाच्या वतीने आदरांजली वाहिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002PMJ9.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  सीमावर्ती भागात पहिल्यांदाच विकास पोहोचत आहे आणि सीमाभाग पर्यटनाच्या दूरदर्शी उपक्रमाचा परिणाम म्हणून,सीमावर्ती भागात राहणार्‍या लोकांचे जीवनमान तर उंचावत आहेच, पण त्या भागातून होणारे स्थलांतरही थांबत आहे, परिणामी त्या भागातील सुरक्षा बळकट होत आहे, असे शहा यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून श्री तनोट माता मंदिराला भेट देणाऱ्या तरुणांना आपल्या सैनिकांचे शौर्य आणि साहस  जाणून घेता यावे या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्र्यांनी जैसलमेरमध्ये सीमाभाग  पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत 17.67 कोटी रुपयांच्या  श्री तनोट मंदिर संकुल प्रकल्पाची पायाभरणी केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003FHIA.jpg

अमित शाह यांनी तनोट मातेचे दर्शन घेतले आणि देश तसेच देशवासियांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0044DE2.jpg

जैसलमेरच्या ऐतिहासिक श्री मातेश्वरी तनोट  राय मंदिराचा अद्भुत इतिहास आहे. शत्रूशी लढण्यासाठी तनोट माता सैनिकांना शक्ती देते आणि युद्धात देशाचे रक्षण करते असे मानले जाते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006RURL.jpg

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858307) Visitor Counter : 192