नौवहन मंत्रालय

भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधण्यात येणार


3,500 कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे हे संकुल सिंधू संस्कृतीपासून ते सध्याच्या काळापर्यंत भारताचा समृद्ध सागरी इतिहास दर्शवेल : सर्बानंद सोनोवाल

पहिला टप्पा मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार

Posted On: 10 SEP 2022 11:04AM by PIB Mumbai

गुजरातमधील लोथल या ऐतिहासिक सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी ) बांधत आहे.भारतातील  भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करणारे अशा प्रकारचे हे  पहिले संकुल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाची पायाभरणी करण्यात आली होती. आणि मार्च 2019 मध्ये बृहत योजनेला   संमती देण्यात आली.

हा प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे:

टप्पा 1ए मध्ये 5 दालनांसह अंशतः संग्रहालय इमारत संकुल  आणि भारतीय नौदल आणि तटरक्षक दल द्वारे उपयोजित नौदल दालन आणि संबंधित जमिनीचा 35 एकर मध्ये विकास समाविष्ट आहे. हा टप्पा 774.23 कोटी रुपये खर्चून अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धती अंतर्गत विकसित केला जात आहे.

टप्पा 1बी मध्ये उर्वरित दालन , दीपगृह , 5डी  डोम थिएटर, बगीचा संकुल  आणि इतर पायाभूत सुविधांसह उर्वरित संग्रहालयाचा समावेश आहे. हा टप्पा ईपीसी पद्धती  अंतर्गत विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

टप्पा 2 मध्ये स्टेट पॅव्हेलियन, लोथल सिटी, सागरी संस्थेसह वसतिगृह , इको रिसॉर्ट्स, सागरी  आणि नौदल संकल्पना उद्यान  , हवामान बदल  संकल्पना उद्यान , प्राचीन इमारत संकल्पना उद्यान  आणि साहसी आणि मनोरंजन उद्यान  यांचा समावेश असेल.या टप्प्यातील घटक सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धती अंतर्गत कार्यान्वित केले जातील.

''शैक्षणिक दृष्टीकोन असलेला बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सागरमाला योजनेंतर्गत हा एक मोठा प्रकल्प आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी समजेल अशा पद्धतीने पद्धतीने सागरी वारसा प्रदर्शित  केला जाईल. ईपीसी  आणि पीपीपी पद्धतीसह राष्ट्रीय सागरी वारसा संकुल  प्रकल्पाचा  एकूण खर्च  3,500 कोटी आहे. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल टप्पा 1ए  चे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे'', असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.
 
या प्रकल्पात गुजरात सरकार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्य महामार्ग 1 ते राष्ट्रीय सागरी वारसा संकुलापर्यंत गुंडी-लोथल-सरागवाला गाव मार्गे 11.58 किमी रस्त्याचे चौपदरीकरण करून संकुलाच्या बांधकाम ठिकाणी पाणी पुरवठा जोडणी  देऊन आणि सागरी वारसा संकुल येथे 66 केव्ही  वीज पुरवठा करण्यासह गुजरात सरकार बाह्य पायाभूत सुविधा विकसित करून प्रकल्पाला पाठबळ  देत आहे.

राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाचे महत्वाचे टप्पे

  • जमिनीवरील 100% काम  पूर्ण झाले (1.7 लाख घन मीटर)
  • 3200 मीटरचे  सीमा कुंपण पूर्ण
  • 1200 झाडे लावण्यात आली.
  • 304 स्तंभिका उभारण्यात आल्या.


राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी मंत्रालयाने भारतीय बंदर, रेल्वे आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल्म ), मुंबई यांची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.

प्रसिद्ध वास्तुस्थापत्य कंपनी  मेसर्स  हाफीज कॉन्ट्रॅक्टर  (एएचसी ) यांची राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पाचे प्रमुख व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.टप्पा  1ए  च्या खालील 5  दालनांसाठी  संकल्पना आरेखन  आणि योजना तयार करण्यात आली आहे:
 
अ ) दालन - 1 अभिमुखता आणि सागरी पौराणिक कथा

ब  ) दालन -2 हडप्पन  : आद्य नाविक

क ) दालन- 3 हडप्पा नंतरचे मार्गक्रमण : हवामान बदलाचा प्रभाव
 
ड ) दालन-- 4  ग्रीको-रोमन जगाशी भारताचा संपर्क

ई ) दालन -  5  विशेष प्रदर्शने

मेसर्स  हाफीज कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांशी सल्लामसलत करून आणि दालनांसाठी सादर केलेल्या कलाकृतींच्या एकत्रित यादीसह दालन  6 च्या (भारतीय नौदलाचा उदय) संकल्पना आरेखनावर  काम सुरू आहे


राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पाच्या  टप्पा  1ए चे बांधकाम, चाचणी आणि सुरु  करण्यासाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी)  कंत्राट टाटा प्रकल्पाला  09 मार्च 2022 रोजी देण्यात आले आहे.आणि 6 मार्च 2024 पर्यंत हा टप्पा  पूर्ण करण्याचे उद्दिष्ट  आहे.

टप्पा 1बी  आणि टप्पा 2 साठी निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे आणि डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

कर्मचारी निवासासाठी  25 एकर अतिरिक्त जमीन निश्चित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारमधील उच्च स्तरावर आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल घेत असलेल्या  भागधारक आणि संबंधित संस्थांसोबतच्या  नियमित आढावा बैठकीद्वारे सतत देखरेख ठेवली जात आहे. 

***

AnkushC/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1858265) Visitor Counter : 481


Read this release in: Hindi , Manipuri