निती आयोग
मोठ्या प्रमाणावरील इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीसाठी पीएलआय योजनेत अधिकारप्राप्त समितीद्वारे पहिल्या वितरणाला मंजुरी
Posted On:
09 SEP 2022 10:25PM by PIB Mumbai
पंतप्रधानांच्या संकल्पनेतील उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेंतर्गत, पहिल्या वितरणात, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील अधिकारप्राप्त समितीने आज 'मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती क्षेत्र' अंतर्गत मोबाइल उत्पादनासाठी प्रोत्साहन मंजूर केले.
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती साठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची पीएलआय योजना भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी स्पर्धात्मक ठिकाण बनवेल आणि जागतिक स्तरावर अव्वल बनून आत्मनिर्भर भारताला चालना देईल अशी अपेक्षा आहे.
भारतातील मेसर्स पैजेट इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड ही कंपनी, आर्थिक वर्ष 2021-22 मधील तिची वाढीव गुंतवणूक आणि विक्रीच्या आकडेवारीच्या आधारे मोबाइल निर्मिती श्रेणी अंतर्गत प्रोत्साहन प्राप्त करण्यासाठी अधिकारप्राप्त समितीने मंजुरी दिलेली पहिली लाभार्थी कंपनी आहे.पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि.
ही डिक्सन टेक्नोलॉजिज (इंडिया) प्राइवेट लिमिटेडची 100% सहाय्यक कंपनी आहे. आणि उत्तर प्रदेशात नोएडा येथे ती मोबाईल निर्मिती करते.
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीसाठी पीएलआय योजनेअंतर्गत बत्तीस लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी 10 (5 जागतिक आणि 5 देशी कंपन्या) मोबाइल निर्मितीसाठी मंजूर करण्यात आल्या होत्या. जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत, या पीएलआय योजनेअंतर्गत अर्जदारांनी 65,240 कोटी रुपयांच्या निर्यातीसह 1,67,770 कोटी रुपयांची विक्री केली होती. या पीएलआय योजनेमुळे 28,636 रोजगार निर्मितीही झाली आहे. गेल्या 3 वर्षात निर्यातीत 139% वाढ झाली आहे. प्रोत्साहन मिळवण्यासाठी इतर लाभार्थ्यांनी केलेले अर्जही लवकरच मंजुरीसाठी विचारात घेतले जातील.
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक निर्मितीसाठीच्या पीएलआय योजनेत मोबाइल फोन निर्मिती आणि विशिष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागाचे उत्पादन समाविष्ट असून मार्च 2020 मध्ये 38,645 कोटी रुपये एकूण खर्चासह ती मंजूर करण्यात आली. या योजनेमुळे 10,69,432 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन होईल आणि 7 लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858185)
Visitor Counter : 154