अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2022-23 साठी 08.09.2022 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलन

Posted On: 09 SEP 2022 9:32PM by PIB Mumbai

 

प्रत्यक्ष कर संकलनाच्या 8 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या  तात्पुरत्या  आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलनाने  स्थिर वाढ नोंदवली आहे.

8 सप्टेंबर 2022 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे एकूण 6.48 लाख कोटी रुपये कर संकलन दर्शवते जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण कर  संकलनापेक्षा 35.46% अधिक आहे.

परताव्याच्या समायोजनानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5.29 लाख कोटी रुपये आहे.जे  गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 30.17% अधिक आहे.हे कर संकलन आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण बजेट अनुमानाच्या  37.24% आहे.

1 एप्रिल 2022 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत 1.19 लाख कोटी रुपयांचा परतावा वितरीत करण्यात आला आहे,जो मागील वर्षातील याच कालावधीत वितरीत केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 65.29% जास्त आहे.

आतापर्यंत, एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने कॉर्पोरेट प्राप्तिकर  (सीआयटी ) आणि वैयक्तिक प्राप्तिकराचा (पीआयटी) वृद्धी दराच्या  संदर्भात , कॉर्पोरेट प्राप्तिकराचा वृद्धीदर  25.95% आहे तर वैयक्तिक प्राप्तिकराचा (एसटीटी सह) वृद्धीदर 44.37% आहे.परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनातील निव्वळ वृद्धी  32.73% आहे आणि पीआयटी  संकलनातील  (एसटीटी सह)  निव्वळ वृद्धी 28.32% आहे.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858180) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi