राष्ट्रपती कार्यालय

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 09 SEP 2022 8:14PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी आज (9 सप्टेंबर, 2022) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

जॉर्जिव्हा यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, जग कोविड महामारीच्या तिसऱ्या वर्षातून जात आहे. त्यांनी नमूद केले की,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँके सारख्या बहुपक्षीय संस्थांद्वारे कमी उत्पन्न असलेल्या अनेक देशांना महत्त्वपूर्ण मदत प्रदान केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेची स्थिरता राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारताच्या स्टार्ट-अप परिसंस्थेचा जगात वरचा क्रमांक लागतो. आपल्या देशातील स्टार्ट-अप्सचे यश, विशेषत: युनिकॉर्नची वाढती संख्या, हे आपल्या औद्योगिक प्रगतीचे तळपते उदाहरण आहे. याहूनही आनंदाची गोष्ट म्हणजे, आपल्या देशाचा विकास सर्वसमावेशक होत आहे आणि प्रादेशिक विषमताही कमी होत आहे. आजच्या भारताचा मूलमंत्र आहे करुणा शोषितांसाठी  करुणा, गरजूंसाठी करुणा आणि उपेक्षितांसाठी करुणा.

2023 मध्ये भारतात होणाऱ्या G-20 शिखर परिषदेबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की G-20 मधील बहुपक्षीय सहकार्य, हे विविधतेला लक्षात घेऊन समावेशन आणि लवचिकतेच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात, G-20 मंच सर्वांसाठी शांततापूर्ण, शाश्वत आणि समृद्ध जग निर्माण करण्याच्या दिशेने बहुपक्षीयता आणि जागतिक शासन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करेल.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858145) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi