सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी उत्कृष्टता केंद्राच्या वतीने गांधीनगर येथे येत्या 11 सप्टेंबर 2022 रोजी 'अहेली खादी' फॅशन शो आणि प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 09 SEP 2022 7:28PM by PIB Mumbai

 

खादी फॉर फॅशन

खादी फॉर नेशन

खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार, खादीचे फॅशन फॅब्रिक म्हणून स्थान निर्माण करणे हे खादी उत्कृष्टता केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे.खादीचा वापर सर्वांनी करावा, विशेषत: आपल्या समाजातील - तरुण वर्गाने त्याला प्रतिष्ठा मिळवून द्यावी याकरीता प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान सतत प्रयत्नशील असतात.

युवावर्गापर्यंत आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने,राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला पाठिंबा देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने खादी उत्कृष्टता केंद्राची  सुरुवात केली होती.यासाठी प्रथम दिल्ली येथे हब आणि,तसेच बेंगळुरू, गांधीनगर, कोलकाता आणि शिलाँग येथे स्पोक्स मॉडेल प्रकारची  केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

खादी उत्कृष्टता केंद्राच्या वतीने रविवार,दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता एनआयएफटी गांधीनगर येथील टाना रिरी प्रेक्षागृहात, ,  'अहेली खादी' नावाने एक वस्त्र प्रदर्शन आणि फॅशन शो सादर करण्यात येणार  आहे.

या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग आयोगाचे(KVIC)अध्यक्ष - श्री मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

अहेली म्हणजे शुद्ध, हा शब्द विशुद्ध खादी उपलब्ध करून देण्याच्या खादी उत्कृष्टता केंद्राच्या प्रयत्नांतून व्युत्पन्न झालेला शब्द आहे,ज्याची निर्मिती थेट खादी निर्माण करणाऱ्या संस्थांकडून सर्व पिढ्यांच्या ग्राहकांसाठी वस्त्रप्रावरणांचे डिझाइन करण्यासाठी केली जाते. खादी उत्कृष्टता केंद्राच्या डिझायनर्सनी वैशिष्ट्यपूर्ण,संयोग करून,पाश्चात्य आणि दररोज घालण्याच्या साधारण प्रकारचे पोशाख आणि साड्यांचे सहा वेगळे कलेक्शन डिझाइन केले आहेत.यात उत्कृष्ट प्रतीच्या खादीमध्ये मोलाची भर घालण्यासाठी हाताने भरतकाम, विविध भरतकाम सुशोभित करणारे टाके(स्टिच डिटेलिंग) आणि हॅन्ड ब्लॉक प्रिंटिंग  यांचा वापर करण्यात आला आहे.

खादी उत्कृष्टता केंद्राचे उद्दिष्ट अशा खादी, वस्त्रप्रावरणांना लोकप्रिय करणे, उच्च स्तरावर प्रोत्साहन देणे आणि पुढे आणणे हे आहे.गृहसजावटीसाठी वापरले जाणारे कापड आणि विविध प्रकारची वस्त्रे या क्षेत्रात पर्यावरणीयदृष्ट्या योग्य कापड म्हणून खादीच्या वापरास प्रोत्साहित करण्याची देखील त्यांची आकांक्षा आहे.

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858131) Visitor Counter : 120