ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
केन्द्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची घेतली भेट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिषदेला केले संबोधित
Posted On:
07 SEP 2022 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
डीओएनईआर (ईशान्य क्षेत्र आर्थिक विकास महामंडळ), पर्यटन आणि संस्कृती मंत्री. जी. किशन रेड्डी यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. भारताच्या ईशान्येकडील राज्यांसह बांगलादेशमधील सहकार्य वाढवण्याच्या विविध शक्यता त्यांनी शेख हसीना यांच्यासमोर मांडल्या. ईशान्येतील राज्यांसोबतचे चांगले व्यापारी संबंध दोन्ही राष्ट्रांसाठी समृद्धी आणि संधी निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सीमापार बाजारपेठ, एकीकृत तपासणी नाके, उभय देशात लोकांच्या दळणवळणासाठीच्या परवाना ठाण्यांची स्थापना आणि बळकटीकरण यासारख्या विविध उपायांद्वारे सीमेवरील व्यापार वाढविटण्याची गरज श्री रेड्डी यांनी निदर्शनास आणून दिली.
श्री किशन रेड्डी यांनी बांगलादेश आणि ईशान्येकडील राज्यांमधील बहुस्तरीय दळणवळण (मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी) वाढवण्याचे आवाहन बांगलादेश पंतप्रधानांना केले. यामुळे विविध क्षेत्रांमधील सहकार्य आणि परस्पर वाढ आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
नंतर, किशन रेड्डी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाजी आणि दोन्ही देशांतील व्यावसायिक नेत्यांच्या उपस्थितीत सीईओंच्या परिषदेला संबोधित केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत-बांगलादेश संबंधांनी सुवर्ण अध्यायात प्रवेश केला आहे , असे रेड्डी म्हणाले.
G.Chippalkatti /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1857769)
अभ्यागत कक्ष : 161