विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जैव तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन साह्य परिषद (डीबीटी- बीआयआरएसी) यांनी विकसित केलेल्या कोविड-19 विरुद्धच्या पहिल्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) दिली परवानगी

Posted On: 07 SEP 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

जैव तंत्रज्ञान विभाग (डीबीटी) – जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन साह्य परिषद (बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल- बीआयआरएसी यांना भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) कोविड-19 विरुद्धच्या पहिल्या नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीच्या आपत्कालीन वापराला अधिकृत परवानगी दिली आहे.

मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत (डीबीटी- बीआयआरएसी समर्थित ) आत्मनिर्भर 3.0 चा भाग म्हणून कोविड-19 लस विकास प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी

आणि गती देण्यासाठी डीबीटी द्वारे या लसीची मोहीम सुरू केली गेली आणि बीआयआरएसीने ती पूर्ण केली. डीबीटी प्रयोगशाळा आणि बीआयआरएसीने लस विकासाच्या विविध स्तरांवर वैज्ञानिक मार्गदर्शन केले. मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत कोविड-19 वरील ही चौथी लस आहे.

ही नाकाव्दारे दिली जाणारी लस अर्थात BBV154 ही इंट्रानासल प्रतिकृती-अपुष्ट चिंपांझी एडेनोव्हायरस SARS-CoV-2 वेक्टर रुपांतरीत केलेली लस आहे. यात स्थिरीकरण केलेल्या स्पाइक SARS-CoV-2 (वुहान प्रकार) व्यक्त करणारे प्रतिकृती कमतरता ChAd वेक्टर आहे.

डीबीटीची स्वायत्त संस्था असलेल्या नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी (एनआयआय)ने चाचणीत सहभागींच्या लस-प्रेरित SARS-CoV-2-विशिष्ट प्रणालीगत आणि श्लेष्मल सेल्युलर प्रतिरक्षा प्रतिसादांचे परीक्षण करण्यासाठी मानवी प्रतिरक्षा देखरेख आणि टी-सेल इम्युनोसेल प्लॅटफॉर्मचा वापर केला. पुणे येथील इंटरॲक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेयर्स (IRSHA), यांनी तीन चाचणी साइट्सवरून व्हायरससाठी न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीचे टायटर मोजण्यासाठी प्लेक रिडक्शन न्यूट्रलायझेशन (PRNT) पूर्ण केले.

कोविड सुरक्षा मोहिमेअंतर्गत आपला विभाग, सुरक्षित आणि प्रभावी कोविड-19 लसींच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. BBV154 कोविड लस ही 18+ वयोगटातील कोविड-19 विरूद्ध प्राथमिक लसीकरणासाठी डीसीजीआय द्वारे मंजूर केलेली पहिली नाकाव्दारे दिली जाणारी लस आहे.

ही लस कोविड सुरक्षा मोहिमे अंतर्गत देशात विकसित केलेली आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधात्मक वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. तिने कोविड-19 लसींच्या संग्रहात भर घातली आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भरता उपक्रमाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. भारत बायोटेकसोबत भागीदारी केल्याबद्दल आणि पहिल्या नाकाव्दारे दिल्या जाणाऱ्या कोविड -19 लसीच्या विकासादरम्यान वैज्ञानिक मार्गदर्शन केल्याबद्दल मी आमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो", असे डीबीटीचे सचिव आणि बीआयआरएसी चे अध्यक्ष डॉ राजेश एस गोखले यांनी या विषयावर बोलताना सांगितले.

 

 

 

 

G.Chippalkatti /P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1857584) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu