PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 07 SEP 2022 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 7 सप्टेंबर 2022

  • 213.91 cr Total Vaccine doses (94.40 cr Second Dose and 17.16 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 18,81,319 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 50,594
  • Active cases stand at 0.11%
  • Recovery Rate currently at 98.7%
  • 7,094 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,38,93,590
  • 5,379 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (1.67%)
  • Weekly Positivity Rate (2.0%)
  • 88.80 cr Total Tests conducted so far; 3,21,917 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCoron

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  213.91 कोटीहून (2,13,91,49,934) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे. आणि एकूण 2,81,13,254 सत्रांतून हे साध्य केले आहे.

12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण  16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.05 कोटी (4,05,07,953) किशोर वयातील मुलांना कोविड-19  चा पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा  देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 50,594इतकी आहे. देशातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रूग्णांची टक्केवारी 0.11 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.70 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत,7,094 रूग्ण कोविडमुक्त झाले असून बरे झालेल्या कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या  आरंभापासून) आता 4,38,93,590 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 5,379 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 3,21,917 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 88.80 कोटी (88,80,68,681) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.00 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.67 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

इतर अपडेट्स :-

 

 

G.Chippalkatti/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857571) Visitor Counter : 122