PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 05 SEP 2022 7:55PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png  https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 213.52 cr Total Vaccine doses (94.36 cr Second Dose and 16.82 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 32,31,895 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 53,974
  • Active cases stand at 0.12%
  • Recovery Rate currently at 98.69%
  • 7,034 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,38,80,464
  • 5,910 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.60%)
  • Weekly Positivity Rate (2.15%)
  • 88.73 cr Total Tests conducted so far; 2,27,313 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 5 सप्‍टेंबर 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 213 कोटी 52 लाख मात्रांचा (2,13,52,74,945)  टप्पा ओलांडला आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4.04 कोटींहून अधिक (4,04,65,525) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याची मोहीम  देखील 10 एप्रिल 2022पासून सुरु करण्यात आली आहे.

भारतातील कोविड उपचाराधीन रुग्णसंख्या आता 53,974  इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.12 टक्‍के आहे. त्यामुळे, भारतातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.69 टक्‍के झाला आहे. गेल्या 24 तासांत 7,034  रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,38,80,464 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 5,910 कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,27,313  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 73 लाखांहून अधिक (88,73,79,274)  चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.15% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.60 %.इतका नोंदला गेला आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856926) Visitor Counter : 174