गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी आज कांकरिया, अहमदाबाद येथे 6व्या अखिल भारतीय तुरुंग कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन केले

Posted On: 04 SEP 2022 8:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतरअतिशय व्यापक आढावा घेतल्यानंतर, जुन्या, तुरुंग मॅन्युअलच्या जागी 2016 मध्ये आदर्श तुरुंग मॅन्युअल आणले गेले.

Description: Description: C:\Users\HP\Downloads\107A1877.jpg

तुरुंग मॅन्युअलनंतर आता सरकार आदर्श तुरुंग कायदाही आणणार आहे, त्यामुळे ब्रिटिश काळापासून चालत असलेल्या या कायद्यात वेळेनुसार आवश्यक ते बदल केले जाणार आहेत.

Description: Description: C:\Users\HP\Downloads\107A1865.jpg

आदर्श तुरुंग कायद्यावर राज्यांशी विस्तृतपणे चर्चा केली जात आहे आणि असा विश्वास आहे की, पुढील 6 महिन्यांत, एक आदर्श तुरुंग कायदा आणला जाईल ज्यामुळे तुरुंगांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्याधुनिक बनवले जाईल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज अहमदाबाद येथील कांकरियामध्ये 6 व्या अखिल भारतीय तुरुंग कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन केले. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) तर्फे आयोजित तीन दिवसीय कारागृह मेळाव्याच्या या उद्घाटन समारंभात, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय गृह सचिव आणि BPR&D चे महासंचालक आणि इतर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.

Description: Description: C:\Users\HP\Downloads\107A1850.jpg

केंद्रीय गृहमंत्र्यांनी, आपल्या भाषणात सांगितले की, या महत्त्वाच्या कारागृह संमेलनामुळे केवळ खेळाडू वृत्तीला सकारात्मक पद्धतीने चालना मिळणार नाही तर तीन दिवसांच्या कालावधीत सहभागींमधील संवाद आणि यशस्वी अनुभवांची देवाणघेवाण होऊन कारागृह  प्रशासनालाही त्याचा फायदा होईल.

Description: Description: C:\Users\HP\Downloads\107A1908.jpg

अमित शहा म्हणाले की, BPR&D आपल्या सीमांच्या अंतर्गत सुरक्षा आणि सुरक्षेशी संबंधित अनेक विषयांवर आणि, विविध पैलूंवर देशभरात एक समान कार्यक्रम तयार करत आहे. तुरुंग प्रशासन हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचाही महत्त्वाचा भाग असून त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असे ते म्हणाले. कारागृहांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचीही गरज आहे. ते म्हणाले की,जर शिक्षा नसेल तर भीती राहणार नाही, भीती नसती तर शिस्त नसते आणि शिस्त नसेल तर निरोगी समाजाची कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे शिक्षेची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असली तरी, जर कोणी स्वभावाने किंवा सवयीने गुन्हेगार नसेल, तर अशा सर्व कैद्यांची समाजासमोर पुन्हा ओळख करून देण्याचे माध्यम बनले पाहिजे, हीही कारागृह प्रशासनाची जबाबदारी आहे.

Description: Description: C:\Users\HP\Downloads\107A2010.jpg

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर अतिशय व्यापक आढावा घेतल्यानंतर जुन्या तुरुंग मॅन्युअलच्या जागी 2016 मध्ये आदर्श तुरुंग मॅन्युअल आणण्यात आले. ते म्हणाले की केवळ 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हे तुरुंग मॅन्युअल स्वीकारले आहे. ते म्हणाले की, इतर राज्यानेही वेळ न घालवता हे आदर्श तुरुंग मॅन्युअल 2016 आत्मसात करून त्या आधारे आपल्या तुरुंग कार्यक्रमांची अंमलबजावणी पुढे न्यावी.

श्री अमित शहा म्हणाले, तुरुंग नियमावलीनंतर, सरकार आता आदर्श तुरुंग कायदा आणणार आहे, ज्यामुळे ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील. सध्या, राज्यांशी यावर व्यापक चर्चा केली जात आहे आणि असा विश्वास आहे कीपुढील 6 महिन्यांत, एक आदर्श तुरुंग कायदा आणला जाईल ज्यामुळे सर्व तुरुंगांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्याधुनिक बनवले जाईल. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, तुरुंगांमधील होणाऱ्या गर्दीच्या मुद्द्यावर राज्यांनाही विचार करावा लागेल कारण जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत तुरुंग प्रशासन सुधारणे शक्य नाही.  शाह म्हणाले की, कट्टरतावादाचा प्रचार आणि अंमली पदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेल्या कैद्यांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्याचीही गरज आहे.

Description: Description: C:\Users\HP\Downloads\107A1832.jpg

अमित शहा म्हणाले की, तुरुंग स्थिती वर सतत दुर्लक्ष केले गेले  आणि तुरुंग हे, कायम दुर्लक्षित क्षेत्र राहिले. आज त्यांच्या आधुनिकीकरणाबरोबरच त्यांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना योग्य बनवणे आणि कैद्यांच्या उत्तम राहण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.

अमित शाह यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या खेळाडूंना  सांगितले की, खेळाडू वृत्ती हीच एक गोष्ट आहे जी आपल्याला आदर्श माणूस बनवण्याच्या दिशेने पुढे नेते. केवळ खेळामुळेच जिंकण्याची जिद्द आणि पराभव स्वीकारण्याची हिंमत निर्माण होऊ शकते. जिंकण्याची जिद्द आणि पराभव स्वीकारण्याची हिंमत नसलेली व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही.

***

G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856690) Visitor Counter : 213


Read this release in: English , Urdu , Gujarati , Tamil