वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (सीप्झ) मधील भव्य सामायिक सुविधा केंद्र (सीएफसी) प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असून अशा प्रकल्पांसाठी तो आदर्श ठरावा: पीयूष गोयल
Posted On:
01 SEP 2022 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (सीप्झ) मधील आगामी भव्य सामायिक सुविधा केंद्राची (सीएफसी) इमारत ही सरकारी आणि सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प देखील कालमर्यादेचे पालन करू शकतात आणि निर्धारित मुदतीत पूर्ण केले जाऊ शकतात याचे उदाहरण ठरावे.
ते आज मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (सीप्झ) मधील भव्य सामायिक सुविधा केंद्राच्या (सीएफसी) इमारतीच्या भूमिपूजन समारंभाला आभासी माध्यमातून संबोधित करत होते.
1 मे 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि हे सीप्झ ला 50 वर्षे पूर्ण होत असताना आणि महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनी साकार होणे हा योगायोग आहे यावर मंत्र्यांनी प्रकाश टाकला.
सीएफसी हा सीप्झ चा मुकुट आहे आणि रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेची (जीजेइपीसी) उल्लेखनीय कामगिरी आहे असे मंत्र्यांनी सांगितले. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की ते आपल्या निर्यात वृद्धीस हातभार लावेल आणि ‘सबका प्रयास’ सह आम्ही निश्चितपणे आमचे ध्येय साध्य करू, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, सीप्झ जागतिक बाजारपेठेतील ‘सुवर्णद्वार’ म्हणून ओळखले जाईल आणि भव्य सीएफसी हा आधुनिक यंत्रसामग्री आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करून रत्न आणि आभूषण क्षेत्रातील जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प असेल.
हे लक्षात घेतले जाऊ शकते की सीएफसी एक सामाजिक प्रकल्प म्हणून देखील काम करेल, कारण ते एककांना विशेषत: लहान आणि मध्यम उद्योगांना मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असलेल्या सुविधा प्रदान करून कार्यक्षमता सुधारण्यास मदत करेल आणि त्यांना मूल्य शृंखला वृद्धिंगत करण्यास मदत करेल.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856131)
अभ्यागत कक्ष : 148