रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपुरात राष्ट्रीय वयोश्री आणि अदिप (अपंग व्यक्तींना सहाय्य) योजनेअंतर्गत कार्यक्रमाचे नितीन गडकरी यांनी केले आयोजन

Posted On: 01 SEP 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री आणि अदीप (अपंग व्यक्तींना सहाय्य) योजनेंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत उपकरणे आणि साहित्य प्रदान केले.

केन्द्र सरकारने, 2016 मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अपंग व्यक्तींचे हक्क कायदा लागू केला. याअंतर्गत 27 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर शहरातील 28,000 आणि नागपूर ग्रामीणमधील 8,000 अशा सुमारे 36,000 लोकांची पडताळणी करण्यात आली. या सर्वांना उपकरणे आणि साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या सर्व उपकरणे आणि साहित्याची एकूण किंमत 34.83 कोटी रुपये आहे.

नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात या उपकरणांच्या वाटपासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, आजचा (1 सप्टेंबर) हा त्याच मालिकेतील दुसरा कार्यक्रम आहे. आज पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील 4,549 लाभार्थ्यांना एकूण 34,130 उपकरणे देण्यात आली आहेत, त्यांची एकत्रित किंमत 4.82 कोटी रुपयांहून अधिक आहे..

या 43 प्रकारच्या उपकरणांमध्ये प्रामुख्याने तीन चाकी सायकल (हाताने चालणारी), व्हील चेअर, चालण्यासाठीच्या काठ्या, डिजिटल श्रवणयंत्र, दृष्टिहीनांसाठी स्क्रीन रीडिंग असलेले स्मार्ट फोन, ब्रेल कॅन (फोल्डिंग कॅन), कृत्रिम हात आणि पाय यांसारखी साधने आणि साहित्य यांचा समावेश आहे.   

 

* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856083) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi