श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक. (2016=100) – जुलै 2022

Posted On: 31 AUG 2022 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2022

 

श्रम विभाग, श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय, देशातील  औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या 88 केंद्रांतर्गत 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किमतींच्या आधारे दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक संकलित करते. हा निर्देशांक 88 केंद्रे आणि संपूर्ण भारतासाठी संकलित केला जातो आणि त्यानंतरच्या महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी प्रकाशित केला जातो. या प्रसिद्धी पत्रकात जुलै 2022 महिन्याचा निर्देशांक प्रसिद्ध केला जात आहे.

जुलै, 2022 साठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI-IW) 0.7 अंकांनी वाढला आणि 129.9 (एकशे एकोणतीस पूर्णांक नऊ दशांश) वर पोचला. 1-महिन्यातील टक्केवारीतील बदलानुसार, मागील महिन्याच्या तुलनेत हा निर्देशांक 0.54 टक्क्यांनी वाढला आहे. मागच्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत ही वाढ 0.90 टक्के इतकी आहे.

सध्याच्या निर्देशांकातील मुख्य योगदान गृहनिर्माण समुहाचे असून या क्षेत्राने एकूण बदलामध्ये 0.37 टक्के गुणांचे योगदान दिले आहे. वस्तूंच्या पातळीवर स्वयंपाकाचा गॅस, घरगुती वीज, बटाटा, कांदा, भोपळा वर्गीय भाज्या, आंबा, केळी, सुकी मिरची, तयार भोजन, गहू, गव्हाचे पीठ, तूर, तूर डाळ इत्यादी निर्देशांक वाढीसाठी जबाबदार आहेत. तर, टोमॅटो, पोल्ट्री चिकन, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम तेल, तांदूळ, सफरचंद, लिंबू, मुळा, लसूण, शेवग्याच्या शेंगा इत्यादींनी निर्देशांकाच्या वृद्धीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.

केंद्र स्तरावर, उधम सिंग नगरने सर्वाधिक ३.८ गुणांची वाढ नोंदवली, त्यानंतर जलपाईगुडी आणि जालंधरने अनुक्रमे ३.३ आणि ३.२ गुणांची नोंद केली. याशिवाय 9 केंद्रांमध्ये 2 ते 2.9 गुणांची, 32 केंद्रांमध्ये 1 ते 1.9 गुणांची आणि 24 केंद्रांमध्ये 0.1 ते 0.9 गुणांची वाढ नोंदवली गेली. याउलट, सालेम इथे सर्वाधिक 4.1 अंकांची घट नोंदवली. याशिवाय, 2 केंद्रांमध्ये 2 ते 2.9 गुणांची, 3 केंद्रांमध्ये 1 ते 1.9 गुणांची आणि 11 केंद्रांमध्ये 0.1 ते 0.9 गुणांची घट नोंदवली गेली. उर्वरित 3 केंद्रांचे निर्देशांक स्थिर राहिले.

जुलै 2022 चा वार्षिक महागाई दर, मागील महिन्यातील 6.16 टक्के आणि मागील वर्षी याच महिन्याच्या 5.26 टक्क्यांच्या तुलनेत 5.78 टक्के होता. त्याचप्रमाणे, अन्नधान्य महागाई दर मागील महिन्याच्या 6.73 टक्के आणि मागील वर्षाच्या याच महिन्यात 4.91 टक्क्यांच्या तुलनेत 5.96 टक्के आहे.

Y-o-Y Inflation based on CPI-IW (Food and General)

All-India Group-wise CPI-IW for June, 2022and July, 2022

Sr. No.

Groups

June, 2022

 July, 2022

I

Food & Beverages

130.0

129.7

II

Pan, Supari, Tobacco & Intoxicants

144.4

144.4

III

Clothing & Footwear

127.0

127.2

IV

Housing

118.9

121.0

V

Fuel & Light

172.8

178.2

VI

Miscellaneous

125.9

126.1

 

General Index

129.2

129.9

 

CPI-IW: Groups Indices

औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI-IW) चा ऑगस्ट, 2022 महिन्याचा पुढील अंक शुक्रवार, 30 सप्टेंबर, 2022 रोजी प्रकाशित केला जाईल. तो कार्यालयाच्या www.labourbureaunew.gov.in. या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल.

 

* * *

S.Patil/Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855875)
Read this release in: English , Urdu , Hindi