उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 30 AUG 2022 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2022

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गणेश चतुर्थी निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपतींनी संदेशात म्हटले आहे :

“गणेश चतुर्थीच्या पवित्र प्रसंगी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.

पारंपारिक उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणारी गणेश चतुर्थी, बुद्धी आणि समृद्धीचे दैवत असलेल्या भगवान गणेशाचा जन्मोत्सव आहे. भारताच्या सांस्कृतिक परंपरेत अत्यंत मानाचे स्थान असलेल्या श्री गणेशाचे प्रत्येक शुभ कार्याच्या आरंभी भक्तांकडून पूजन केले जाते.

भारताच्या संमिश्र संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा गणेश चतुर्थीचा सण जात, पंथ, धर्म किंवा प्रदेशाच्या सीमा पार करतो. या प्रसंगी माझ्या सर्व देशवासीयांना उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो, अशी मी प्रार्थना करतो.”   

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1855596) आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil