युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धर्मेंद्र प्रधान, अनुराग सिंग ठाकूर, निशीथ प्रामाणिक यांनी खेळाडू आणि फिटनेस आयकॉन्सशी साधला संवाद


26 नामवंत खेळाडूंनी देशभरातील शाळांना भेट दिली

प्रविष्टि तिथि: 29 AUG 2022 10:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2022

 

देशभरात  राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत असून यानिमित्त केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री  धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय युवा व्यवहार  आणि क्रीडा मंत्री  अनुराग सिंह ठाकूर व  युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री  निशीथ प्रामाणिक यांनी खेळाडू आणि फिटनेस आयकॉन्सशी संवाद साधला.

या कार्यक्रमात बोलताना प्रधान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार खेळांना लोकप्रिय करण्यासाठी आणि खेळाडूंच्या प्रतिभेला अधिक वाव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील  अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून खेळांचा विचार केला आहे  आणि खेळाबरोबरच एकात्मिक शिक्षण आणि तंदुरुस्तीला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवण्यावर  भर देण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

शिक्षण मंत्रालयाने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून सूचना आणि मते  मागवली आहेत ज्यांचा  क्रीडा आणि युवक-संबंधित विषयांवरच्या   पुस्तकांमध्ये समावेश करता येऊ शकेल अशी माहितीही त्यांनी दिली.

याच अनुषंगाने  ठाकूर म्हणाले, "भारताला क्रीडा केंद्र  आणि क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याची  वेळ आली आहे. आपल्या क्रीडापटूंनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दाखवलेली कामगिरी तसेच खेळाचे साहित्य, आहार, प्रशिक्षण, परदेशी संधी यासारख्या गरजांसाठी सरकारतर्फे खेलो इंडिया आणि टॉप्स सारख्या विविध योजनांद्वारे दिले जाणारे पाठबळ हे आत्मविश्वास वाढवणारे आहे.  मला विश्वास आहे की, जर आपण एकत्र काम केले तर आपण भारताला क्रीडा महासत्ता बनवू शकू.''

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील सुवर्णपदक विजेती मुष्टियोद्धा निखत जरीन, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील सुवर्णपदक विजेती पॅरा-टेबल टेनिसपटू भाविना पटेल, माजी कुस्तीपटू आणि प्रेरक वक्ते  संग्राम सिंह आणि समग्र जीवनशैली आणि आहारतज्ज्ञ  ल्यूक कौटिन्हो  यांचा  देखील पॅनेलमध्ये समावेश होता.

या कार्यक्रमात दुसऱ्या फिट इंडिया शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेची घोषणा करण्यात आली.  या प्रश्नमंजुषा स्पर्धेला  पहिल्या वर्षी  मोठे यश मिळाले आहे.दुसऱ्या वर्षासाठी  शाळांची नोंदणी 3 सप्टेंबर 2022 ते  15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सुरू राहील. या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांसाठी  एकूण 3.25 कोटी रुपये रकमेची बक्षिसे  आहेत.

या वर्षी प्रथमच राष्ट्रीय क्रीडा दिन देशभरात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने एक भव्य क्रीडा उत्सव म्हणून साजरा केला.  यामध्ये खेळ, तंदुरुस्ती आणि संतुलित आहार  या तीन महत्त्वाच्या बाबींवर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रथमच 26 दिग्गज खेळाडूंनी देशभरातील जम्मू ते त्रिवेंद्रमपर्यंत 26 शाळांना भेट दिली .

S.Kulkarni/Sushama/Sonal C/PM

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1855355) आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil