कृषी मंत्रालय
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ.अभिलक्ष लिखी यांनी पुणे जिल्ह्यात बारामती येथील भाजीपाला उत्कृष्टता केंद्राला दिली भेट
Posted On:
29 AUG 2022 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2022
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या , कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी पुणे जिल्ह्यात बारामती येथील भारत - डच यांच्या सहकार्याने स्थापित भाजीपाला उत्कृष्टता केंद्राला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
भाजीपाला उत्पादनासाठी प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करणे आणि या क्षेत्रातील विस्तार अधिकारी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून तंत्रज्ञान हस्तांतरित करणे हा, हे उत्कृष्टता केंद्र स्थापनेमागचा उद्देश आहे. भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील (शेत /पीएचटी-काढणीनंतरचे तंत्र /साठवणूक /वाहतूक) नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाची ओळख शेतकरी आणि विस्तार अधिकाऱ्यांना करून दिली जात आहे.
विविध स्तरावरील अधिकारी,स्वयंसेवी संस्था , खाजगी उद्योजक इत्यादींच्या प्रशिक्षणाची सुविधा या उत्कृष्टता केंद्रात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मूल्य साखळी विकसित करण्याचा, रोजगार निर्मिती आणि बाजार बुद्धिमत्तेला चालना देण्याचा मार्ग या केंद्राने मोकळा केला आहे.
अनेक तरुणांना शेतीकडे आकर्षित करताना, हे केंद्र गरजू लोकांना स्वयंरोजगार आणि तंत्रज्ञान जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देखील प्रदान करते
भारत -डच सहकार्याने स्थापण्यात येणाऱ्या 7 केंद्रांना आतापर्यंत 4 राज्यांमध्ये मान्यता देण्यात आली आहे.त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 2 केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. आणि 5 उत्कृष्टता केंद्र पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांवर आहेत.
डॉ.लिखी यांनी बारामती येथील उत्कृष्टता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र (केवीके) डच ग्रीन हाऊसलाही भेट दिली.याचा उद्देश कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त पीक उत्पादन घेणे हा आहे उदा. पाणी, कीटकनाशके, मनुष्यबळ इ, जे केवळ उद्योजकांसाठी मूल्य वाढवत नाही तर अवशेष मुक्त उत्पादनाची गुणवत्ता देखील वाढवते. संरक्षित लागवडीखालील तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यावर या ग्रीन हाऊसने मुख्य लक्ष केंद्रित केले आहे.
डॉ. लिखी यांनी बारामतीच्या उत्कृष्टता केंद्राच्या कार्याचाही आढावा घेतला यावेळी उत्कृष्टता केंद्राच्या संचालकांनी तपशीलवार सादरीकरण केले. या प्रदेशात कार्यरत कृषी स्टार्ट-अप्स, सर्व 7 उत्कृष्टता केंद्र आणि 3 खाजगी उत्कृष्टता केंद्रांनी व्यवहार खर्च कमी करण्यासाठी आणि फळे व भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेत अधिक चांगले दुवे निर्माण करण्यासाठी त्यांच्याद्वारे वापरल्या जाणार्या नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.या संवादादरम्यान, मंत्रालयाचे अधिकारी, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेचे अधिकारी, सर्व उत्कृष्टता केंद्रांचे संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फलोत्पादनासाठीच्या 23 राष्ट्रीय संशोधन केंद्रांचे राज्य फलोत्पादन संचालक आणि इतर हितसंबंधीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते .
विशेषत: किफायतशीर शेती करण्यासाठी त्याचा लाभ लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांना मिळावा यादृष्टीने 7 उत्कृष्टता केंद्रामध्ये सराव होत असलेल्या तांत्रिक प्रात्यक्षिकांचा उत्कृष्टता केंद्रांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार सुनिश्चित करण्याचे निर्देश डॉ.लिखी यांनी सर्व संबंधितांना दिले.
S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855318)
Visitor Counter : 216