राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेदरलँड्सच्या महाराणी मॅक्झिमा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 29 AUG 2022 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2022

 

नेदरलँड्सच्या महाराणी मॅक्झिमा यांनी  आज (29 ऑगस्ट 2022) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेतली.

राष्ट्रपतींनी महाराणी मॅक्झिमा यांचे स्वागत केले आणि भारत आणि नेदरलँडमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. या बैठकीदरम्यान भारताच्या माजी राष्ट्रपतींनी  एप्रिल 2022 मध्ये केलेल्या नेदरलँड्स दौऱ्याचाही उल्लेख झाला.

एप्रिल 2021 मध्ये भारत-नेदरलँड्स आभासी शिखर परिषदेदरम्यान सुरू करण्यात आलेली ‘पाण्यासंबंधी  धोरणात्मक भागीदारी’ आणि द्विपक्षीय संबंधांचे  इतर अनेक पैलू गेल्या काही वर्षात अधिक बळकट  झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी  एक असलेल्या सार्वत्रिक आर्थिक समावेशकतेच्या विविध बाबींवरही दोन्ही नेत्यांनी विस्तृत  चर्चा केली. राष्ट्रपती म्हणाल्या  कीप्रत्येक भारतीयाला विविध माध्यमांद्वारे औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी  जोडण्यासाठी आणि सरकार देत असलेले लाभ  शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणि इच्छित लाभार्थीपर्यंत थेट पोहचतील हे सुनिश्चित  करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. गेल्या काही वर्षांत भारताने या दिशेने केलेल्या प्रगतीची  महाराणी मॅक्झिमा यांनी प्रशंसा केली.

संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या विशेष अधिवक्ता आणि G20 GPFI(जी 20 आर्थिक समावेशन ) मानद संरक्षक म्हणून महाराणी मॅक्झिमा 29 ते 31 ऑगस्ट, 2022 दरम्यान भारत भेटीवर आहेत.

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1855314) Visitor Counter : 157