माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डॉ. एल मुरुगन यांनी जम्मू येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मीडिया युनिट्ससोबत घेतली आढावा बैठक
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2022 10:32PM by PIB Mumbai
28 ऑगस्ट, 2022: केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज जम्मू येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मीडिया युनिट्ससोबत आढावा बैठक घेतली.

रेडिओ हे ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वोत्तम माध्यम असल्याचे सांगून सरकारच्या प्रसारमाध्यम प्रसिद्धीबरोबरच आकाशवाणी आणि दूरदर्शनने महसूल निर्मितीवरही लक्ष दिले पाहिजे यावर मुरुगन यांनी भर दिला.
खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकदा वापरायच्या प्लास्टिकचा वापर करण्यास परावृत्त करण्यासाठी काम करण्याचे निर्देश मंत्र्यांनी जम्मू येथील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व मीडिया युनिट्सना बैठकीदरम्यान दिले.
प्रदेशाचे अतिरिक्त महासंचालक, राजिंदर चौधरी यांनी जम्मू -काश्मीर पत्र सूचना कार्यालय आणि जम्मू-काश्मीर, लडाख केंद्रीय संचार ब्युरो आणि त्यांच्या फील्ड युनिट्सद्वारे चालवलेल्या प्रसारमाध्यम उपक्रम आणि मोहिमांवर तपशीलवार पॉवरपॉइंट सादरीकरण दिले.
बैठकीत मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम श्रवण केला आणि सर्व मीडिया युनिट्सना सोशल मीडिया हँडल आणि उपलब्ध इतर महत्त्वाच्या माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा अधिक प्रचार करण्याच्या सूचना दिल्या.
मंत्र्यांनी आज जम्मू मधील, बहू येथील बाग-ए बहू मत्स्यालयाला भेट दिली. जम्मूच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या मंत्र्यांनी श्री माता वैष्णो देवी आणि बावे वाली माता यांचेही दर्शन घेतले. मुरुगन यांनी काल रियासी येथील मत्स्यव्यवसायाला भेट देऊन मत्स्यशेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप केले.
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1855122)
आगंतुक पटल : 182