भूविज्ञान मंत्रालय
देशभरात सध्या सुरू असलेल्या किनारपट्टी स्वच्छता अभियानाला अभूतपूर्व प्रतिसादः केंद्रीय़ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
नामवंत व्यक्ती, चित्रपट तारेतारका, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील लोकांचा यात सहभाग
सध्याच्या किनारपट्टी स्वच्छता अभियानाला आणखी चालना देण्यासाठी ड़ॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते www.swachhsagar.org या समर्पित संकेतस्थळाचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2022 6:34PM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या 75 दिवसांच्या देशव्यापी किनारपट्टी स्वच्छता अभियानात नामवंत व्यक्ती, चित्रपट तारे तारका, विद्यार्थी आणि सर्व स्तरातून लोकांनी सहभाग घेतला असून या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे, असे केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री, (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. येत्या 17 सप्टेंबरला या अभियानाची सांगता होणार आहे.
अभियानाला मिळालेल्या इतक्या मोठ्या प्रतिसादाने उत्साहित झालेल्या डॉ. सिंग यांनी आज या स्वच्छता मोहीमेस आणखी चालना देण्यासाठी www.swachhsagar.org या संकेतस्थळाचा प्रारंभ केला.

मंत्र्यांनी लोगो वासुकी ही मोहीमही सुरू केली असून ज्या युवकांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत किनारपट्टीचे प्रदेश तसेच सागर किनारे स्वच्छ करण्यासाठी अत्यंत स्वारस्य दाखवले आहे आणि स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले आहेत, त्या देशातील युवा वर्गाला ती समर्पित आहे.
अशा प्रकारच्या सर्वाधिक काळ चाललेल्या मोहीमेच्या प्रगतीबद्दल माध्यमांना माहिती देताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याचा सातत्याने पुनरूच्चार करतात, त्या ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टीकोनावर या मोहिमेची रचना केली आहे, याकडे दिशानिर्देश केला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाबरोबरच, पर्यावरण, वने आणि हवामान बदल, जलशक्ती,आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन, परराष्ट्र व्यवहार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयही या मोहिमेत सक्रीय सहभागी आहेत.

75 दिवसांच्या या किनारपट्टी स्वच्छता अभियानाच्या पहिल्या वीस दिवसांत आतापर्यंत 200 टन कचरा मुख्यतः एकल वापराच्या प्लॅस्टिकचा ज्यात समावेश आहे, किनारपट्टीवरून हटवण्यात आला आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. 5 जुलै 2022 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी समाधानपूर्वक असेही नमूद केले की, आतापर्यंत 24 राज्यांतून 52000 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी 75 दिवसांच्या या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर मोहिमेत सहभागाची नोंदणी केली आहे. ही मोहीम सागराच्या स्वच्छतेबाबत आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती तयार करण्यासाठी असून तिची सांगता आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनी म्हणजे 17 सप्टेंबर 2022 रोजी होईल.
मंत्र्यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्याना समाजसेवी संस्था, नागरिक समूह, मुले आणि युवा मंच, कॉर्पोरेट कंपन्या, ना नफा तत्वावर चालणाऱ्या संघटना, किनारपट्टीवरील राज्यांच्या नगरपालिकांचे कर्मचारी यांना या मोहिमेत सहभागी करून तिचे रूपांतर जन आंदोलनात करण्याच्या सूचना दिल्या.
17 सप्टेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिन असून त्या दिवशी डॉ. जितेंद्र सिंह यांनी नागरी समाजाच्या सदस्यांकडून सागर किनाऱ्यावर साचलेला मुख्यतः एकल वापराचे प्लॅस्टिकसह 1500 टन कचरा हटवण्यासाठी सक्रीय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. योगायोगाने हाच दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसही असून तो दिवस देशभरात सेवा दिवस म्हणून साजरा केला जाईल . डॉ. सिंह यांनी सर्वांना 17 सप्टेंबर रोजी व्यापक स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले असून या अभियानांतर्गत देशभरातील 75 सागरी किनाऱ्यावर स्वच्छता केली जाणार आहे.
***
N.Chitale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1855061)
आगंतुक पटल : 249