संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे भारत-अमेरिका विशेष सैन्य दलांच्या संयुक्त सरावाची  सांगता

Posted On: 28 AUG 2022 5:43PM by PIB Mumbai

 

13 व्या भारत-अमेरिका विशेष दलांच्या संयुक्त सरावाची, वज्र प्रहार 2022 ची आज बकलोह (हिमाचल प्रदेश) येथे सांगता झाली. या वार्षिक सरावाचे यजमानपद भारत आणि अमेरिका आळीपाळीने भूषवत असतात. ऑक्टोबर 2021 मध्ये 12वा सराव  अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या लुईस मॅक कॉर्ड  येथे संयुक्त तळावर झाला होता.

दोन्ही राष्ट्रांच्या विशेष फौजांना हवाई मोहिमा , विशेष मोहिमा आणि दहशतवाद विरोधी कारवाई यासंबंधी 21 दिवसांच्या संयुक्त प्रशिक्षणाची संधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेअंतर्गतप्रत होते. सराव  दोन टप्प्यात झाला, पहिल्या टप्प्यात, युद्ध परिस्थितीत आणि सामरिक स्तरावरील विशेष मिशनसंबंधी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पार पडली तर दुसऱ्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यातील दोन्ही राष्ट्रांच्या तुकड्यांनी  घेतलेल्या प्रशिक्षणाच्या 48 तासांच्या प्रमाणीकरणाचा समावेश होता.

या प्रात्यक्षिकांच्या फलिताविषयी  म्हणजे  साध्य केलेली मानके, जेव्हा दोन्ही तुकड्यांनी संयुक्त प्रशिक्षण घेतले तेव्हा दोन्ही देशांतील सर्वोत्कृ ष्ट सरावपद्धती सामायिक करणे, पर्वतीय प्रदेशात मुद्दाम तयार करण्यात आलेल्या पारंपरिक आणि गैरपारंपरिक स्थितीमध्ये मॉक प्रात्यक्षिकांचे नियोजन आणि त्याची अमलबजावणी याबाबत दोन्ही तुकड्यांनी समाधान व्यक्त केले.

सध्याच्या जागतिक परिस्थितीत दोन्ही देश सामोरे जात असलेल्या सुरक्षा आव्हानांच्या संदर्भात अमेरिकन विशेष तुकडीसमवेत करण्यात आलेली वज्र प्रहार सराव  अत्यंत महत्वाचा आहे.  भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यात सुधारणा आणि संयुक्त लष्करी प्रात्यक्षिके यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या विशेष तुकड्यांमधील परंपरागत चालत आलेले मैत्रीचे बंध अधिकच पक्के झाले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/IMG_49684AQR.jpghttps://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/IMG_5013UKE3.jpg

***

N.Chitale/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1855052) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil