आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 211 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना देण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रांची संख्या 4.02 कोटींहून अधिक

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 86,591

गेल्या 24 तासात देशात 9,436 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.62 टक्के

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.70 टक्के आहे

Posted On: 28 AUG 2022 1:12PM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 211 कोटी 66  लाखांचा (2,11,66,35,408) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,82,08,570 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4.02 कोटींहून अधिक (4,02,51,855) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,932

2nd Dose

1,01,05,548

Precaution Dose

67,22,684

FLWs

1st Dose

1,84,34,350

2nd Dose

1,76,96,816

Precaution Dose

1,30,86,008

Age Group 12-14 years

1st Dose

4,02,51,855

2nd Dose

3,00,68,992

Age Group 15-18 years

1st Dose

6,16,50,847

2nd Dose

5,22,59,094

Age Group 18-44 years

1st Dose

56,05,07,685

2nd Dose

51,27,89,310

Precaution Dose

5,87,72,292

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,89,334

2nd Dose

19,62,49,040

Precaution Dose

3,34,03,843

Over 60 years

1st Dose

12,75,71,104

2nd Dose

12,26,65,911

Precaution Dose

4,00,96,763

Precaution Dose

15,20,81,590

Total

2,11,66,35,408

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 86,591 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.19 टक्‍के आहे.

त्यामुळे, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.62 टक्‍के झाला आहे. गेल्या 24 तासांत 9,999 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,37,93,787 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 9,436  कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,22,551 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 50 लाखांहून अधिक (88,50,42,801) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.70 टक्‍के आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.93% इतका नोंदला गेला आहे.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854995) Visitor Counter : 125