वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी), भारतातील 40 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा

Posted On: 26 AUG 2022 9:26PM by PIB Mumbai

 

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) विशेष सचिवांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय प्रकल्प देखरेख गट (प्रॉजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप Invest India)  यांच्यासह भारतभरातील 40 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आज झालेल्या बैठकीत आढावा घेतला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच रेल्वे मंत्रालयाकडे समस्या सोडविण्यासाठी सूचीबद्ध केलेल्या समस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रो ॲक्टिव्ह गव्हर्नन्स ॲण्ड टायमली इंप्लिमेंटेशन (प्रगती) अंतर्गत पुनरावलोकन केलेल्या 11 प्रकल्पांचा आणि अनेक मोठ्या गतिशक्ती प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.

A picture containing text, tableDescription automatically generated

या बैठकीत वनविभागाच्या मंजुऱ्या, रेल्वेच्या जमिनीचा वापर, मार्गाचा अधिकार इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय तसेच रेल्वे मंत्रालयाचे  वरिष्ठ अधिकारी सहभागी  झाले होते.  दोन्ही मंत्रालयांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्त वेळापत्रक दिले. याव्यतिरिक्त, वापरकर्त्या एजन्सीच्या अधिकार्‍यांनी प्रकल्पांच्या एकूण प्रगतीबद्दल त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला.

अंदाजे 3.37 लाख कोटी रूपयांच्या अपेक्षित गुंतवणुकीसह 40 प्रकल्पांमधील 57 मुद्द्यांचा डीपीआयआयटीच्या विशेष सचिवांनी आढावा घेतला. सामाजिक-आर्थिक महत्त्व असलेले प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचे महत्त्व आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील सातत्यपूर्ण समन्वयाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.

गतीशक्ती योजनेवर केंद्र सरकारचा भर, पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे आणि प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचे निराकरण करणे या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी प्रॉजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप (PMG) ची स्थापना करण्यात आली आहे.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854761) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi