दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार पायाभूत सुविधांसाठी गती-शक्ती व्हिजन - 5G च्या जलद कार्यान्वयनासाठी 'राईट ऑफ वे' नियमांमध्ये सुधारणा
Posted On:
25 AUG 2022 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022
केंद्रीय दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज एका कार्यक्रमात भारतीय टेलिग्राफ राईट ऑफ वे नियम 2016 मधील सुधारणा जारी केल्या. राईट ऑफ वे अर्थात दूरसंवाद टॉवर्स उभारणे , ऑप्टिकल फायबर्स केबल टाकणे इत्यादीसाठीच्या ढाच्यात सुधारणा केल्यामुळे दूरसंवाद पायाभूत सुविधा वेगाने आणि सुलभरित्या तैनात करणे शक्य होईल. भारतात 5G चे जलद कार्यान्वयन व्हावे यासाठी, गतिशक्ती संचार पोर्टलवर नव्या 5G राईट ऑफ वे अर्जदेखील जारी करण्यात आले. डीसीसीचे अध्यक्ष आणि सचिव (दूरसंचार )के राजारामन, दूरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात,अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 5G सेवांचे जलद कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी 4 मूलभूत घटकांचा उल्लेख केला. यात प्रामुख्याने स्पेक्ट्रमचे वाटप, राईट ऑफ वे परवानगी प्रक्रियेत सुधारणा, सहकारी संघराज्य आणि सेवांची अंमलबजावणी यांचा उल्लेख केला. स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. एकात्मिक पद्धतीने पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने दूरसंवाद विभागाने मे 2022 मध्ये गतिशक्ती संचार पोर्टल सुरू केले.
N.Chitale/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1854522)
Visitor Counter : 247