वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते 'वाणिज्य विभागाची पुनर्रचना' यावरील अहवालाचे प्रकाशन
Posted On:
23 AUG 2022 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथील वाणिज्य भवन येथे "वाणिज्य विभागाची पुनर्रचना "यावरील अहवालाचे प्रकाशन करताना सांगितले की, भारताला जागतिक व्यापारातील प्रमुख देश बनवणे हे संपूर्ण वाणिज्य विभागाची पुनर्रचना करण्यामागचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले की ही पुनर्रचना 5 प्रमुख स्तंभांवर अवलंबून आहे.हे पाच स्तंभ म्हणजे जागतिक व्यापारात भारताचा वाटा वाढवणे, बहुराष्ट्रीय संघटनांमध्ये नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे, व्यापाराचे लोकशाहीकरण करणे, जागतिक दर्जाचे 100 भारतीय ब्रँड तयार करणे आणि उत्पादन पाया मजबूत करण्यासाठी आणि जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारतात आर्थिक क्षेत्रांची स्थापना करणे हे होय.
गोयल म्हणाले की भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वाणिज्य विभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. हीच गोष्ट आंतरराष्ट्रीय दृष्टीने सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास आणि इतर देशांसोबत अधिक बहुपक्षीय आणि द्विपक्षीय सहभागासाठी तयार करण्यास भारताला सक्षम करेल, असेही ते म्हणाले.
गोयल म्हणाले की ही पुनर्रचना ‘आत्मनिर्भर भारत’ आणि आत्मनिर्भर वाणिज्य विभागावर केंद्रित असलेला एक मोठा प्रयत्न आहे. अहवालाचे 14 खंड वाणिज्य विभागातील प्रत्येक शाखेची भूमिका निश्चित करतात, तसेच अपेक्षित परिणाम आणि प्रमुख कामगिरी निर्देशांक सूचित करतात.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853989)
Visitor Counter : 197