विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अनुसूचित जाती आणि जमातींच्या वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग देशाच्या विविध भागात 75 विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रे उभारत आहे -डॉ.जितेंद्र सिंह
Posted On:
23 AUG 2022 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय,कार्मिक,सार्वजनिक तक्रारी, सेवानिवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, विशेषत: अनुसूचित जाती आणि जमातींच्या वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि या समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय देशाच्या विविध भागात 75 विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रे स्थापन करत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कन्व्हेन्शन सेंटर येथे “भारतीय आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणामध्ये तंत्रज्ञानाचे महत्त्व” या विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, अशा 33 विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हबची स्थापना करण्यात आली आहे, तर 7 केंद्रे लवकरच सुरू होणार आहेत. ते म्हणाले की, या केंद्रांचा अनुसूचित जाती आणि जमातीच्या 30,000 लोकांना शेती, बिगरशेती, इतर संबंधित उपजीविका क्षेत्र आणि ऊर्जा, पाणी, आरोग्य, शिक्षण इत्यादीसारख्या विविध उपजीविकेच्या साधनांमध्ये थेट लाभ होईल.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853949)
Visitor Counter : 158