रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
छोट्या गुंतवणूकदारांना पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवे मॉडेल विकसित केले जाईल- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Posted On:
23 AUG 2022 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022
छोट्या गुंतवणूकदारांना पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करता यावी, यासाठी, नवे मॉडेल विकसित केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. फिक्कीच्या रस्ते आणि महामार्गविषयक तिसऱ्या शिखर परिषदेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या क्षेत्रात गुंतवणूक केल्यानंतर, गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळण्याची संधी या मॉडेलमध्ये असेल, असेही त्यांनी सांगितले. आज देशात, जगातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे विकसित होत आहे असे सांगत, हे जाळे अधिक व्यापक करत, 2024 च्या अखेरपर्यंत ते दोन लाख किलोमीटरपर्यंत नेण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांसाठीचा लॉजिस्टिक खर्च 16 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणण्याचे आव्हान आहे, असे गडकरी यांनी सांगितले. लॉजिस्टिक खर्चात कपात करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे आणि एलएनजी आणि इथेनॉल, मिथेनॉल, हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांना प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण ते किफायतशीर आणि स्वच्छ इंधन आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1853933)