पंचायती राज मंत्रालय
स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव याविषयी संकल्पना आधारित दृष्टिकोनाच्या माध्यमातून पंचायतींमधील शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी) या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्या चंडीगढ येथे उद्घाटन
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील,आणि पंजाब सरकारमधील ग्रामविकास आणि पंचायत मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन समारंभ
या कार्यशाळेला देशभरातील पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले 1300 प्रतिनिधी उपस्थित राहणार
Posted On:
21 AUG 2022 6:39PM by PIB Mumbai
स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या सहाव्या संकल्पनेविषयी संकल्पना आधारित दृष्टीकोनाच्या माध्यमातून पंचायतीमध्ये शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी)' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे पंजाबमधील चंडीगढ येथे 22 ते 23 ऑगस्ट 2022 दरम्यान, आयोजन करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील,आणि पंजाब सरकारमधील ग्रामविकास आणि पंचायत मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. देशभरातील पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले अंदाजे 1300 प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.या राष्ट्रीय कार्यशाळेत तब्बल 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत.
ज्या पंचायती रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदिवे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखाने, सामान्य सेवा केंद्र, स्थानिक बाजारपेठा, अंगणवाडी केंद्र, पशुधन मदत केंद्र, समुदाय केंद्र या क्षेत्रात स्वयंपूर्ण पायाभूत सुविधांच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने मूलभूत सेवा पुरवत आहेत त्यांना या कार्यशाळेत त्यांचे अनुभव आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्स, धोरणे यांची माहिती सामाईक करण्यासाठी, तळागाळापर्यंत स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव ही संकल्पना राबवण्याचा, दृष्टीकोन प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे.
या राष्ट्रीय कार्यशाळेत, विविध विषयांवरील दृष्टीकोनासह तळागाळातील शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) संस्थात्मक करण्याच्या अनुषंगाने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांचे अनुभव आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्स, धोरणे, दृष्टिकोन प्रदर्शित करतील आणि सामायिक करतील. पंचायती राज मंत्रालयाकडून सुधारित राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या वितरणासंदर्भात तपशीलवार सादरीकरण केले जाईल.
क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण; चांगल्या पद्धती; देखरेख आराखडा , प्रोत्साहन आणि ग्रामपंचायत विकास आराखड्यात (जीपीडीपी). शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संकल्पना आधारित दृष्टीकोनाचे प्रतिबिंब उमटण्यासाठी अनुकरणीय धोरणे, दृष्टिकोन, एकत्रित कृती आणि या संदर्भातील नाविन्यपूर्ण मॉडेल्स प्रदर्शित करणे हा या राष्ट्रीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
दूरगामी संकल्पना आधारित दृष्टिकोनाद्वारे तळागाळात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाची प्रक्रिया संस्थात्मक करण्यासाठी विविध मॉडेल्सच्या माध्यमातून पंचायतींना बारकाईने अभ्यास करता यावा या अनुषंगाने ही राष्ट्रीय कार्यशाळा व्यासपीठ उपलब्ध करून देईल. तसेच आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक प्रशासनातील विनिमय कार्यक्रमांद्वारे माहिती/कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करेल.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1853480)
Visitor Counter : 365