सांस्कृतिक मंत्रालय

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनाचा भाग म्हणून ललित कला अकादमीमध्ये जागतिक छायाचित्रण दिनी आयोजित केलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 19 AUG 2022 9:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली येथे ललित कला अकादमीच्या दीर्घांमध्ये आजच्या जागतिक छायाचित्रण दिनी’’ आयोजित केलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे  उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार, पद्मश्री रघु राय यांनी ललित कला अकादमीच्या अध्यक्षा उमा नंदुरी यांच्या उपस्थितीमध्ये केले.

या प्रदर्शनासाठी 'भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्थाने' अशी संकल्पना निश्चित केली होती. त्याप्रमाणे किल्ले, डोंगर, प्राचीन मंदिरे आणि देशातील वारसा स्थळांच्या  छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या छायाचित्र  प्रदर्शनासाठी देशभरातून 423 कलाकारांकडून  1603 प्रवेशिका आल्या. त्यापैकी 135 छायाचित्रे निवडून त्यांचे  प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

 

देशाच्या  स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी ललित कला अकादमीच्यावतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमांमध्ये शिबिरे, प्रदर्शन, व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे आदिंचा समावेश आहे.

छायाचित्रांचे हे प्रदर्शन दि. 28 ऑगस्ट, 2022 पर्यंत खुले राहणार आहे.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853222) Visitor Counter : 118


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri