वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार हा मोदी सरकारचा महत्त्वाचा अजेंडा: केंद्रीय वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

Posted On: 17 AUG 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2022

 

मुक्त व्यापार करार यशस्वी होण्यासाठी  वस्त्रोद्योग क्षेत्राला महत्त्वपूर्ण  भूमिका बजावायची  आहे, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. 'पुढील दशकासाठी वस्त्र आणि परिधान उद्योगाची पुनर्कल्पना' या विषयावर दहाव्या आशियाई वस्त्रोद्योग परिषदेत (टेक्सकॉन) बीजभाषण करताना गोयल बोलत होते.  विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार ( FTA ) हे मोदी सरकारच्या विषयपत्रिकेवरचा मुख्य विषय आहे, असेही गोयल म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/Gallery/PhotoGallery/2022/Aug/I20220817116358.JPG

विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीत नवोन्मेष महत्त्वपूर्ण ठरणार  आहे, असे गोयल म्हणाले. त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्व मूल्य साखळ्यांमध्ये नवोन्मेषाची भूमिका अधोरेखित केली आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील पुनर्वापर आणि डिजिटलीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. अभिनवता, शाश्वतता, डिजिटलीकरण, नवीन उत्पादने आणि मुक्त व्यापार करारा (FTAs) च्या वापरावर आपल्या उद्योग क्षेत्राने भर दिला तर या  क्षेत्राचा वेगाने विकास होऊ शकतो आणि जगातील सर्वोत्तम कंपन्यांशी ते स्पर्धा करू शकते, असे त्यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/Gallery/PhotoGallery/2022/Aug/I20220817116356.JPG

शाश्वततेवर बोलताना गोयल म्हणाले की पुन्हा वापरता येण्याजोग्या संसाधनांचा वापर करून वस्त्रोद्योग क्षेत्र पर्यावरणावर येणारा ताण कमी करू शकते तसेच स्वतःचा उत्पादन खर्च कमी करू शकते.

पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय वस्त्रोद्योग महासंघ ( CITI )आणि इजिप्शियन कॉटन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही उद्योग संस्था परस्पर फायद्यासाठी एकत्र काम करतील.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852733) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi