राष्ट्रपती कार्यालय

पारशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 15 AUG 2022 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2022

 

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी पारशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “पारशी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मी सर्व देशवासीयांना, विशेषत: आपल्या पारशी बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचे शुभचिंतन करते .

पारशी समाजाने आपल्या देशाच्या विकासात आपल्या मेहनती, समर्पित आणि उद्योजकतेद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारताची सर्वसमावेशक संस्कृती सर्व नागरिकांना नेहमीच एकोप्याने राहण्याची प्रेरणा देते.

पारशी नववर्षाचा हा विशेष दिवस आपल्या जीवनात समृद्धी, शांती आणि सौहार्द घेऊन येवो आणि परस्पर बंधुभावाप्रति आपली बांधिलकी दृढ करो.

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852123) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi