रेल्वे मंत्रालय

रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी नांदगाव येथे एलटीटी अर्थात लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर काशी एक्सप्रेस रेल्वेसाठी थांब्याची सुविधा सुरू केली.

Posted On: 14 AUG 2022 6:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी आज 14.8.2022 रोजी नांदगाव येथे, रेल्वे क्रमांक 15017-एलटीटी अर्थात लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपुर काशी एक्सप्रेस रेल्वे, साठी थांब्याची सुविधा व्हिडिओ लिंक द्वारे हिरवा झेंडा दाखवून सुरू केली.

 

यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थित मान्यवर, माध्यम प्रतिनिधी आणि रेल्वे प्रवाशांचे मुंबई मुख्यालयातून व्हिडिओ लिंक द्वारे स्वागत केले. रेल्वेचे भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांनी आभार प्रदर्शन केले. मुंबई मुख्यालयातून वरिष्ठ अधिकारी आणि भुसावळ  विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नांदगाव येथून या कार्यक्रमाला हजेरी लावली.

खालील तीन रेल्वे गाड्यांना दिनांक 14.8.2022 आज पासून पुढच्या सहा महिन्यांसाठी नांदगाव आणि लासलगाव या रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे.

नांदगाव येथे

15017 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर एक्सप्रेस नांदगाव येथे सकाळी ११.२९ वाजता पोहोचेल आणि ११.३० वाजता सुटेल.

15018 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नांदगाव येथे सकाळी ११.३९ वाजता पोहोचेल आणि सकाळी ११.४० वाजता सुटेल.

22177  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्सप्रेस नांदगाव येथे पहाटे  05.04 वाजता पोहोचेल आणि 05.05 वाजता सुटेल.

22178 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महानगरी एक्सप्रेस नांदगाव येथे पहाटे 05.39 वाजता पोहोचेल आणि 05.40 वाजता सुटेल.

 

लासलगाव येथे

11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस कामायनी एक्स्प्रेस 17.37 वाजता लासलगाव येथे पोहोचेल आणि 17.38 वाजता सुटेल.

11072  बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस 17.59 वाजता लासलगाव येथे पोहोचेल आणि 18.00 वाजता सुटेल.

टीप: दि. 14.8.2022 रोजी पासून प्रवास सुरू होणाऱ्या वरील सर्व गाड्यांसाठीचे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851825) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu , Hindi