संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतले पदक विजेते आणि सैन्य दलातल्या सहभागी खेळाडूंशी साधला संवाद


या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आणि देशाचा अभिमान वाढवल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी खेळाडूंची केली प्रशंसा

Posted On: 12 AUG 2022 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022

 

इंग्लंड येथील बर्मिंगहॅम येथे नुकत्याच झालेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदकांची कमाई करणाऱ्या सैन्य दलातल्या सहभागी खेळाडूंसोबत आज 12 ऑगस्ट 2022 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे संवाद साधला. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान झालेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेत तिन्ही सैन्य दलातल्या एकूण 31 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यातली सर्वात प्रशंसनीय बाब म्हणजे या सहभागी खेळाडूंपैकी 15 खेळाडूंनी, भारतासाठी सहा सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई केली.

सुवर्णपदक विजेता नायब सुभेदार जेरेमी लालरीनुनूंगा, हवालदार अचिंता शेऊली, सुभेदार अमित, सुभेदार दीपक पुनिया, एजी पीओ पीटी नवीन आणि एजी पीओ कमांडंट (टेल), एलदोसे पॉल यांनी या गौरव समारंभात कार्यक्रमात हजेरी लावली, त्याचबरोबर रौप्य आणि कांस्य पदक विजेते  आणि इतर सहभागी खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेतल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजनाथ सिंह यांनी त्यांची  प्रशंसा  केली त्याचबरोबर देशाचा अभिमान उंचावण्यासाठी भविष्यात येणाऱ्या इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, नौदलाचे प्रमुख आर. हरीकुमार, संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू उपस्थित होते.

तिन्ही सैन्य दलातल्या पदक विजेत्या खेळाडूंची यादी खालील प्रमाणेः

S No

Service

Name

Discipline

Performance

1

 

Army

Nb Sub Jeremy Lalrinnunga

Weightlifting

Gold

2

Hav Achinta Sheuli

Weightlifting

Gold

3

Sub Amit

Boxing

Gold

4

Sub Deepak Punia

Wrestling (FS)

Gold

5

Nb Sub Avinash Sable

Athletics

Silver

6

Sub Sandeep

Athletics

Bronze

7

Sub Md Hussamuddin

Boxing

Bronze

8

Rect Hav Deepak

Wrestling (FS)

Bronze

9

Air Force

JWO Vikas Thakur

 

Weightlifting

Silver

10

JWO Gururaja

Bronze

11

SGT A Aboobacker

Triple Jump

Silver

12

Navy

Ag PO PT Naveen

Wrestling

Gold

13

Ag PO Com (Tel) Eldhose Paul

Triple Jump

Gold

14

Com I (Tel) Lovepreet Singh

Weightlifting

Bronze

15

POCOM (Tel) Jugraj Singh

Hockey

Silver

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851368) Visitor Counter : 191