युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर उद्या युवा संवाद “इंडिया@2047” ला संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2022 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर 12 ऑगस्ट रोजी आकाशवाणी रंग भवन, नवी दिल्ली येथे आयोजित युवा संवाद “इंडिया@2047” ला संबोधित करतील. राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि युवा प्रतिनिधींसह सुमारे 400 युवा, ज्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय युवा प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध देशांमध्ये पाठवले गेले, ते या कार्यक्रमात सहभागी होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाखाली भारत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव @ स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आणि देशाच्या जनतेचा आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून 8 -14 ऑगस्ट, 2022 हा आयकॉनिक सप्ताह युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला देण्यात आला आहे.
हा कार्यक्रम यामध्ये सहभागी होणार्या तरुणांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपले विचार व्यक्त करण्याची संधी देईल. त्याशिवाय, हा कार्यक्रम त्यांना एकमेकांशी जोडले जाण्यास आणि विचारांचे आदान-प्रदान करायला व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
“युवा संवाद” समारंभात प्रेरणा देणारे वक्ते/युवा आयकॉन देखील उपस्थित राहतील आणि पुनरुत्थानशील भारतासाठीच्या त्यांच्या दृष्टिकोनाबाबत युवकांशी संवाद साधतील, जे तरुणांचे मनोबल मोठ्या प्रमाणात वाढवेल आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी आपली सेवा द्यायला जोमाने पुढे यायला प्रेरित करेल.
S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1851077)
आगंतुक पटल : 160